Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार संतोष रासवे यांना आर्दश पत्रकार पुरस्कार जाहिर

पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळा

माजलगाव प्रतिनिधी - तालुक्यातील खरात आडगाव येथील रहिवासी तथा दैनिक जगमित्र चे माजलगाव तालुका प्रतिनिधी संतोष रासवे यांना यशवंत प्रेरणादायी आधार स

विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राची भरारी
एसटी कर्मचार्‍यांच्या शरद पवारांच्या घरावर हल्ला | DAINIK LOKMNTHAN
मंत्री छगन भुजबळ गोपीनाथ गडावर; स्व. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिस्थळी घेतले दर्शन

माजलगाव प्रतिनिधी – तालुक्यातील खरात आडगाव येथील रहिवासी तथा दैनिक जगमित्र चे माजलगाव तालुका प्रतिनिधी संतोष रासवे यांना यशवंत प्रेरणादायी आधार सामाजिक संस्था,पुणे (आळंदी देवाची) कडुन आर्दश पत्रकार पुरस्कार जाहिर करण्यात आला असुन याचा वितरण सोहळा 29आक्टोबर रविवार रोजी पत्रकार भवन गांजवे चौक पुणे येथे होणार आहे. सदरील संस्थेच्या 6वर्धापन दिना निमित्त राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रात मोठे योगदान देणार्‍यां ना पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव सारख्या छोट्या गावात राहुन हि संतोष रासवे यांनी त्यांच्या लेखणीतुन पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत त्यामुळे याची दखल घेत आर्दश पत्रकार पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांना संस्थे कडुन देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय युवा गौरव पुरस्कारांतरर्गत आर्दश पत्रकार देऊन सन्माननीत केले जाणार आहे,पुरस्कार जाहिर करण्यात आल्याचे नमुद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बाबासाहेब दिवटे यांनी पत्राद्वारे संतोष रासवे यांना कळविले आहे. या पुरस्काराचे वितरण पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांचे हस्ते व मराठवाड्यातील वाचन चळवळीचे प्रणेते अंनत कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्धी सेवाभावी उद्योजक रामदास माने ,मावळवार्ता फाऊंडेशनचे संचालक संजय अडसुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. संतोष रासवे यांना आर्दश पत्रकार पुरस्कार जाहिर झाल्या बद्दल खरात आडगाव येथील ग्रामस्थां सह तालुक्यातील सर्व पत्रकार व विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी रासवे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS