Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी फॅक्टरी येथील पत्रकाराचा अपघातात मृत्यू

देवळाली प्रवरा :राहुरी फॅक्टरी येथील सुर्यानगर येथील रहिवासी मनोज संतुराम हासे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी 12

संगमनेरमध्ये 3 ते 4 सप्टेंबरला इंदिरा महोत्सवाचे आयोजन
कोरोनामुळं मृत झालेल्यांना भरपाई अशक्य l DAINIK LOKMNTHAN
खा. लोखंडेंचा स्वीय सहायक दिशागतच ठरतोय विजयात अडथळा  

देवळाली प्रवरा :राहुरी फॅक्टरी येथील सुर्यानगर येथील रहिवासी मनोज संतुराम हासे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी 12 वाजेदरम्यान राहुरी फॅक्टरी येथील वाणी मळा शिवारात नगर-मनमाड मार्गावर घडली आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पत्रकार मनोज हासे (वय वर्ष-42) हे त्यांच्याकडील असलेल्या दुचाकीवरून नगर-मनमाड मार्गावरून जात असताना वाणीमळा पुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन ते जागीच मृत्युमुखीपडले. याचवेळी पारनेर येथील विधानसभा निवडणुकीची ड्युटी उरकून गणेगाव येथे घरी जात असलेल्या होमगार्ड चांगदेव कोबरणे, होमगार्ड सतीश कोबरणे यांना हासे हे मृत्युमुखी अवस्थेत दिसून आले असता घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांना बोलाविण्यात येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, अशोक शिंदे, बाबासाहेब शेळके, प्रवीण बागुल तसेच हॉटेल साई समाधानचे दत्तात्रय दरंदले, राजमुद्रा उद्योग समूहाचे प्रशांत मुसमाडे, पत्रकार श्रीकांत जाधव, मंगेश ढुस, निखिल गोपाळे, अक्षय गाडेकर , पत्रकार शरद पाचारने, बबन आहेर, यांनी मदतकार्य केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS