Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी फॅक्टरी येथे ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन

देवळाली प्रवरा ः सिंधुदूर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला असून या घटनेचा शिवसेना उद्धव ठाकरे

संगमनेरमध्ये गोवंश कत्तलखान्यावर छापा
दूध उत्पादकांचे प्रश्‍न त्वरित सोडवा  
भारताची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत दुसर्‍या क्रमांकाची होईल : कडलग

देवळाली प्रवरा ः सिंधुदूर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला असून या घटनेचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने रविवारी सकाळी राहुरी फॅक्टरी येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धअभिषेक घालून दमबाजी करणार्‍या नारायण राणे व निलेश राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून संताप व्यक्त केला.
        शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रमुख उपस्थित तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रारंभी जय भवानी जय शिवाजी जय घोष करत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर नगर- मनमाड रस्ता अडवून नारायण राणे व निलेश राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला.यावेळी हमीद पटेल, दत्तात्रय कडू, सुधीर झांबरे, सुनील शेलार, पोपट शिरसाठ, शहाजी वराळे, अनिल खपके, गणेश खेवरे, विलास खपके, रतन खुळे, विठ्ठल कोळसे, सचिन क्षीरसागर, गणेश जाधव, शर्फद्दीन पठाण, भारत मोरे, दिगंबर कदम, मधुकर म्हसे, सोमनाथ हारदे, काकासाहेब शिंदे, रोहित शिंदे, शाम नान्नोर, भरत धोत्रे, सोमनाथ लोंढे, मनीष देठे, दिगंबर कोहोकडे, अरविंद सोनवणे, अमोल कुर्‍हाडे, विठू राऊत आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

COMMENTS