Homeताज्या बातम्यादेश

रोजगार मेळाव्यात 71 हजार उमेदवारांना नोकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली नियुक्तीपत्रे

नवी दिल्ली प्रतिनिधी - देशात बेरोजगारी वाढल्याचा डंका पिटला जात असतांनाच, केंद्र सरकारने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हजारो तरूणांना नोकरी द

मोदींच्या स्वागतासाठी निसर्गही गेला सडा शिंपडून  
हवाई वाहतूकीत भारत जगातील तिसरी मोठी बाजरपेठ – पंतप्रधान मोदी
मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज नाना पटोले l DAINIK LOKMNTHAN

नवी दिल्ली प्रतिनिधी – देशात बेरोजगारी वाढल्याचा डंका पिटला जात असतांनाच, केंद्र सरकारने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हजारो तरूणांना नोकरी देण्यात येत आहे.  मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘रोजगार मेळावा’ योजनेचा भाग म्हणून तब्बल 71 हजार तरुणांना नियुक्तीपत्र दिली आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या तरुणांशी संवादही साधला. शिक्षक, प्राध्यापक, नर्स, नर्सिंग ऑफिसर, डॉक्टर, फार्मासिस्ट्स, रेडिओग्राफर्स अशा अनेक तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदासाठी ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.
बेरोजगारीच्या समस्येवर तोडगा म्हणून केंद्र सरकारने ‘रोजगार मेळावा’ या नावाने हा उपक्रम सुरू केला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारकडून 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. या सर्व नियुक्त्यांमध्ये सर्वाधिक नियुक्त्या या केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये अर्थात सीएपीएफमध्ये करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहविभागाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रोजगारासाठी प्राधान्य दिले जात असून त्यांनी दिलेलं आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS