Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरफोडीच्या गुन्ह्यांमधील 11 लाखांचे दागिने जप्त

कराड / प्रतिनिधी : कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घरफोडीचे दोन गुन्हे उघड करून 11 लाख 16 हजार रुपये किमतीचे साडेपंधरा तोळ्या

राज्यात पुढचे 4 दिवस मुसळधार; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
सांगलीत महापूर काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा
कवठेएकंदजवळ विटा-सांगली बसवर दगडफेक; चालक जखमी

कराड / प्रतिनिधी : कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घरफोडीचे दोन गुन्हे उघड करून 11 लाख 16 हजार रुपये किमतीचे साडेपंधरा तोळ्यांचे दागिने जप्त केले आहेत. याप्रकरणी परशुराम बुटाप्पा ओलेकर (रा. शिंदगी वाळीज, जि. विजापूर, कर्नाटक) यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आगाशिवनगरमधील अयोध्यानगरी आणि मलकापूरमधील शास्त्रीनगर येथे सप्टेंबर महिन्यात दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि अशोक भापकर यांचे पथक या गुन्ह्यांचा तपास करीत होते. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्‍लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितास मिरज, ता. मिरज, जि. सांगली येथून ताब्यात घेतले होते. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्याला अटक करून, पोलिसांनी साडेपंधरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक भापकर, श्रध्दा आंबले. पोलीस उपनिरीक्षक भंडारे, निखिल मगदूम, हवालदार शशी काळे, अमित पवार, अशोक वाडकर, अनिल स्वामी, अमोल देशमुख, धीरज कोरडे, मोहसीन मोमीन, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, हर्षल सुखदेव, आनंदा जाधव, मुकेश मोरे, प्रशांत वाघमारे, सपना साळुंखे, सोनाली पिसाळ, कुलदीप कोळी, संदीप कुंभार यांनी ही कारवाई केली.

COMMENTS