Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयवंतराव भोसले पतसंस्थेची 395 कोटींची व्यवसायपूर्ती : डॉ. अतुल भोसले

कराड / प्रतिनिधी : येथील सहकार महर्षी जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेने सन 2021-22 या आर्थिक वर्षात कोविड-19 च्या बिकट परिस्थितीतही उत्तुंग

1 जुलैपासून एकल वापर प्लास्टिकवर बंदी : शेखर सिंह
रूसा सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांसमवेतच्या आढावा बैठकीत रूसा अंतर्गत २६.५१ कोटी अनुदानाचे वाटप
सांगोला तालुक्यात झालेल्या अपघातात वरकुटे-मलवडी येथील दोन तरुणांचा मृत्यू

कराड / प्रतिनिधी : येथील सहकार महर्षी जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेने सन 2021-22 या आर्थिक वर्षात कोविड-19 च्या बिकट परिस्थितीतही उत्तुंग प्रगती साधली. 395 कोटी 2 लाख रूपयांची व्यवसायपूर्ती केली आहे. तसेच संस्थेला 2 कोटी 17 लाख रूपयांचा ढोबळ नफा प्राप्त झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
याबाबत प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांच्या प्रेरणेने 21 वर्षांपूर्वी ही पतसंस्था सुरू करण्यात आली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला. सामान्य शेतकरी, कष्टकरी समुदायातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्था कार्यरत आहे. पतसंस्थेकडे 31 मार्च 2022 अखेर एकूण 13 कोटी 82 लाख रुपयांचा स्वनिधी व स्थावर मालमत्ता आहे. संस्थेकडे 234 कोटी 70 लाखांच्या ठेवी असून, 160 कोटी 61 लाखांचे कर्जवितरण करण्यात आले आहे. संस्थेचा निव्वळ एनपीए हा शून्य टक्के राहिला आहे. संस्थेचे एकूण 57,230 खातेदार असून, गेल्या आर्थिक वर्षात 27 टक्क्यांहून अधिक व्यवसायवृध्दीचे उद्दिष्ट गाठले आहे. येत्या आर्थिक वर्षात 600 कोटींचा एकत्रित व्यवसाय करण्याचा संस्थेचा मानस आहे.
गेल्या 2 वर्षांपासून देशात वेगाने फैलावलेल्या कोराना साथीच्या काळातही संस्थेने सर्व संचालक मंडळ, सभासद, खातेदार व कर्मचार्‍यांच्या सहकार्याने चांगली कामगिरी करत, व्यवसाय वृध्दीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळविले आहे. आज संस्थेचे मलकापूर येथील प्रधान कार्यालय आणि उंबज व सातारा शाखा या स्वमालकीच्या इमारतीत आहेत. सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेच्या 20 शाखा असून, भविष्यात पतसंस्थेचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा मनोदय संस्थापक डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील व व्यवस्थापक ए. के. यादव उपस्थित होते.

COMMENTS