Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयंत पाटील राजकारणातील नारदमुनी : सुरज चव्हाण

इस्लामपूर / प्रतिनिधी : देशाच्या विकासासाठी व देशहितासाठी अजितदादा पवार व सहकरी महायुती बरोबर आले. महायुतीच्या पाठींबा पत्रावर जयंत पाटील यांची

… तर वडूज नगरपंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादीबरोबर
ठाण्यात एका रात्रीत उपचारादरम्यान 17 रुग्णांच्या मृत्यू; अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत
साहेबांनी तालुका राज्यात अग्रेसर ठेवला : प्रतीक पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : देशाच्या विकासासाठी व देशहितासाठी अजितदादा पवार व सहकरी महायुती बरोबर आले. महायुतीच्या पाठींबा पत्रावर जयंत पाटील यांची ही सही होती,पण त्याच्यातील विश्‍वासघातकी गुण वळवळला आणि ते गायब झाले. पण शरद पवार यांच्या घरफोडीतील मोरक्या जयंत पाटीलच आहेत. त्यांच्या विश्‍वासघातकी राजकारणाचा शेवट आता इस्लामपूर मतदार संघातील सुज्ञ मतदार करेल, असे मत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत प्रकाश भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ येडेमच्छिंद्र येथे आयोजीत केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
निशिकांत प्रकाश भोसले-पाटील म्हणाले, या मतदार संघात सत्तेच्या जोरावर खर्‍या अर्थाने विद्यमान आमदारांनी मतदार संघाचा विकासात्मक चेहरा-मोहरा बदलणे आवश्यक होते. मात्र, विकासाचे राजकारण न करता शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडा पण शेतकर्‍यांच्या ऊसाला अपेक्षीत दर ही दिला नाही. ऐन दिवाळीत शेतकर्यांच्या घरी कशी दिवाळी साजरी झाली हे आपण पाहिले. अर्थिक शोषण करण्याबरोबर, युवकांच्या बेरोजगारीला हे नेतृत्व जबाबदार आहे. निवडणुकीनिमित्त मी दिलेला निर्धारनामा विचारपुर्वक तुमच्या हाती दिला आहे. या निवडणुकीत मला आशिर्वाद द्या पुढील पाच वर्षात निर्धारनाम्यातील सर्व कामे मार्गी लावण्याचे वचन मी तुम्हाला देतो. पुढील पाच वर्षात प्रत्येक मतदार मोकळा श्‍वास घेईल यासाठी कोणत्याही दबावाला, गुंडगिरीला बळी पडू नका मी तुमच्या प्रत्येक हाकेला हजर असेन हि क्रांती घडविण्याची वेळ आहे. यामध्ये प्रत्येक मतदाराचा मोलाचा वाटा असेल, सर्वत्र चांगले वातावरण आहे, काळजी करु नका, 23 तारखेचा गुलाल उधळायला या क्रांतीकारकांच्या भूमीत मी येईन.
रयत क्रांती संघटनेचे युवा नेते सागर खोत म्हणाले, जयंत पाटील यांनी ऊस दराबाबत ब्र शब्द काढला नाही. हे येथील कष्टकरी शेतकर्‍यांचे दुर्देव आहे. राजारामबापू कारखान्याची इतर कारखान्यापेक्षा रिकव्हरी जास्त आहे. सरासरी 600 ते 700 रुपये टनाला आपल्याला कमी मिळाले आहेत. हे राज्यातील इतर कारखान्याच्या दरावरुन स्पष्ट झाले आहे. कष्टाचे पैसे हाणणार्‍याला आता त्याची जागा दाखवुन द्या. भविष्यात शेतकर्‍यांच्या कष्टाचे पैसे मिळवुन देण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पुढे असो, एकदा परिवर्तन घडवा हि स्वाभिमानाची व न्यायाची लढाई आहे. यामध्ये प्रत्येक माय माऊली व कष्टकरी शेतकर्‍यांचा आशिर्वाद निशिकांतदादांना द्या विजय आपलाच आहे. विरोधकाला समोर पराभव दिसू लागल्याने महाराष्टात मिरवणारा विरोधक इस्लामपूर मतदार संघाच्या गल्ली-बोळात दिसायला लागला आहे. त्यांनी नमस्कार केला तर आमच्या कष्टाच्या पैशाचे काय हा जाब विचारा ते उत्तर देऊ शकणार नाहीत. यावेळी केदार पाटील, रावसाहेब पाटील, विरेंद्र राजमाने, सागर मलगुंडे, राहुल खराडे, प्रशांत पाटील, दादासो पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

COMMENTS