इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामनगर येथील जयंत स्पोर्ट्स यांच्यावतीने जयंत क
इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामनगर येथील जयंत स्पोर्ट्स यांच्यावतीने जयंत कबड्डी प्रीमियर लीग 24 ते 28 फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे. 20 फेब्रुवारी म्हणजे रविवारी या स्पर्धा होणार होत्या. मात्र, शिगाव येथील जवान रोमित चव्हाण हे शहीद झाले. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन राज्य हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील व राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 28 रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक व राष्ट्रीय कबड्डीपटू खंडेराव जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली.
खंडेराव जाधव म्हणाले, या स्पर्धा 20 फेब्रुवारी म्हणजे रविवारी पासून सुरू होणार होत्या. मात्र, शिगाव येथील जवान रोमित चव्हाण हे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच शिगाव गावचे काही खेळाडू या प्रीमियर लीगमध्ये खेळत आहेत. रोमित चव्हाण देखील कबड्डीपटू होते. त्यांनी दिलेले बलिदान वाया जाऊ देणार नाही.
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराज पाटील यांचा राजारामबापू इगल्स कासेगाव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील यांचा स्व. जगदीश पाटील (आप्पा) रायडर्स कामेरी, आदिती उद्योग समूहाचे पृथ्वीराज पाटील यांचा आदिती पॅथर्स ओझर्डे, रवींद्र पाटील वाळवा यांचा राजेंद्र पाटील युवा मंच फायटर्स, अतुल लाहिगडे कासेगाव यांचा शरद लाहीगडे हरीकॉन्स, सागर पाटील, संजय जाधव (जुनेखेड) यांचा स्फूर्ती रॉयल्स हे गेल्या वर्षीचे 6 संघ खेळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील यांचा जय हनुमान पतसंस्था आणि शिराळाचे युवा नेते पृथ्वीराज नाईक यांचा शिराळा कोबरा हे दोन संघ नव्याने सहभागी केले आहेत. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने, राष्ट्रीय कबड्डीपटू विकास पाटील हे दोघे या समितीचे सदस्य असतील. व्यासपीठ रचना बदलली असून संघाचे मालक मान्यवर अतिथी व महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे. पत्रकार परिषदेस विकास पाटील, सागर जाधव, संदीप कदम, विजय देसाई यांची उपस्थिती होती.
COMMENTS