Homeताज्या बातम्यासंपादकीय

जरांगे पाटील मुळात: आरक्षण विधेयक !

ब्राह्मण्यवाद हा जसा विषमतेचा पोषक असतो तसाच त्या विचारांचे वाहक केवळ ब्राह्मण हेच नसतात तर खास करून ज्यांना सत्ता संपत्तीमध्ये अधिक वाटा मिळालेल

घटनात्मक वर्चस्व कुणाचे !
रूग्णांचा नव्हे, नागरिकांचा डेटा सेल! 
एक्झिट पोल आणि वास्तव !

ब्राह्मण्यवाद हा जसा विषमतेचा पोषक असतो तसाच त्या विचारांचे वाहक केवळ ब्राह्मण हेच नसतात तर खास करून ज्यांना सत्ता संपत्तीमध्ये अधिक वाटा मिळालेला असतो, त्या जात समुहाचेही काही भाटही भट बनलेले असतात. मनोज जरांगे पाटील आता जे विचार बोलत आहेत, ते मराठा आरक्षणाचे हिताचे नसून, एकूणच दिलेलं सामाजिक आरक्षण बंद करण्याची भाषा ते करत आहेत. याचा अर्थ ते मुळातच आरक्षणाचे विरोधक आहेत! परंतु, आरक्षणाच्या भूमिकेत अडथळा निर्माण करून देशातलं आरक्षण संपवून फक्त या देशातील ब्राह्मण- बनियांना बिनबोभाट देशाची संपत्ती देऊन टाकावी, अशी त्यांची भूमिका दिसते आहे.  आता ते मारवाडी ब्राह्मण यांनाही आरक्षण देण्यात यावं, अशी थेट मागणी करू लागले आहेत. याचा अर्थ त्यांचं नेतृत्व म्हणून उगमस्थान नेमकं कुठून आहे, हे देखील आता स्पष्ट होऊ लागले आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणतीही मागणी करताना ओबीसींनी संविधानिक मर्यादा आणि संविधानिक तत्वांचे कायम पालन केलं आहे. त्यानुसारच त्यांनी आपल्या हक्काची कोणतीही मागणी केली आहे. याउलट जरांगे पाटील हे लोकशाहीला जुमानत असल्याचं दिसत नसून, संविधानिक मर्यादा तोडून केवळ बाहूबळाच्या आधारे ते आपल्याला आरक्षण मिळवण्याची भाषा करत आहेत.

परंतु, आरक्षणासाठी संसद आणि त्यात बनवले जाणारे कायदे, याचा ते जराही विचार करित नाहीत; शिवाय, त्या कायद्यांना असल्याचे दिसत नाही. जर, त्यांनी खरोखर लोकशाही पध्दतीने मागणी केली तर, ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघारी परतले नसते.  प्रत्यक्षात ज्या ठिकाणी निवडणुका येतील त्या ठिकाणी माघारी जायचं आणि निवडणुका संपल्या की पुन्हा आपली तलवार उपसायची, अशा प्रकारचं आंदोलन हे धरसोडीचे आंदोलन आहे. या धरसोडी मागे कुठल्यातरी राजकीय पक्षाला मदत होईल, या डावपेचांची आखणी दिसते. सामाजिक सलोखा बिघडवून लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणतीही मागणी पूर्ण करून घेण्याचा अट्टाहास करणं म्हणजे लोकशाहीला विरोध करणं होय.  लोकशाहीला विरोधाची जी परिसिमा गेल्या दहा वर्षांमध्ये  वाढल्याचे दिसते आहे. त्याचं मनोज जरांगे हे प्रतिनिधित्व करीत आहेत; हे कालच्या त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकारचे वक्तव्य गुजरात मध्ये पटेलांसाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या हार्दिक पटेल यांनीही केली होती. त्यावेळी हार्दिक पटेलला देशभरातून आरक्षण समर्थकांचा विरोध पत्करावा लागला होता. मनोज जरांगे पुन्हा तीच चूक करता आहेत. ते मराठ्यांचं आरक्षण ओबीसी मधूनच हवं, हा जो त्यांचा अट्टाहास  हा अट्टाहास सामाजिक वीण बिघडवणारा आहे. आता तर ते मारवाडी, ब्राह्मण यांनाही आरक्षण द्या असं म्हणत, ज्यांना आरक्षण दिलेले आहे, त्यांचं आरक्षणच रद्द करा; असं विषम सामाजिक तत्व पुढे  आणत आहेत.  सरकार जर अशा तत्वांचा स्वीकार करण्यासाठी किंवा त्यांना मोठे करण्यासाठी जर पुढे सरसावत असेल तर, लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका या लवकरच येऊ घातल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये ओबीसी समुदाय हा आरक्षणासाठी तर लढेलच, परंतु, एकंदरीत या शक्ती देशाच्या फुले आंबेडकरी विचारधारेच्या दिशेने नेण्यासाठी कटिबद्ध राहील. यात कोणताही वाद असणार नाही. म्हणून जरांगे पाटील यांचे वक्तव्य आता ओबीसींच्या विरोधातच नव्हे, तर एकंदरीत मराठा समाजाचीच ते फसवणूक करत आहेत. कारण आरक्षण विरोध ही मराठा समाजाची भूमिका नाहीये. तर, इतरांच्या बरोबरीने येण्यासाठी आपल्याला आरक्षणाचा लाभ मिळवायचा असेल तर आपलं सामाजिक मागासवर्गीय पण अधिक शास्त्रीय दृष्ट्या पुढे आणायला हवं. मात्र यात मनोज जरांगे पाटील हे यशस्वी होत नाहीयेत. त्यांच्या अट्टाहासापाई आणि त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण तेच धोक्यात आणत आहेत. त्यांना मारवाडी-ब्राह्मणांविषयी असणार प्रेम आता उतू जात आहे, हेच त्यांच्या वक्तव्यावरून म्हणता येईल. त्यांचं खरं दुखणं हे मराठ्यांना आरक्षण न मिळणं हे नसून, इतरांना मिळणार आरक्षण हे संपवता कसं येईल आणि ब्राह्मणी व्यवस्थेला आपल्याला मजबुती कशी देता येईल, हाच त्यांचा उद्देश आहे.  त्यामुळे या विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांना मजबूती देण्याचं त्यांचं धोरण यामागे दिसतं. असा आता स्पष्ट म्हणायला हरकत नाही.  ते मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मराठा समाजाचे आरक्षण मागत जरांगे पाटील हे मराठा समाजाची फसवणूक करत आहेत.

COMMENTS