जामखेड प्रतिनिधी ः राष्ट्रीय पातळीवरील इन्स्पायर अँबॅसकस स्पर्धेत जामखेड येथील कु जान्हवी रामदास टेकाळे या विद्यार्थ्यांनीने चॅम्पियन ट्रॉफीचे पह
जामखेड प्रतिनिधी ः राष्ट्रीय पातळीवरील इन्स्पायर अँबॅसकस स्पर्धेत जामखेड येथील कु जान्हवी रामदास टेकाळे या विद्यार्थ्यांनीने चॅम्पियन ट्रॉफीचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. सनराईज एज्युकेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस अकॅडमीच्या वतीने 8 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील ऑफलाईन अबॅकस स्पर्धेचे सरस्वती सांस्कृतिक भवन अहमदनगर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप व माजी मंत्री आ. सूरेश धस यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी देशभरातून 976 विद्यार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियन ट्रॉफीचे प्रथम पारितोषिक मिळविलेली जान्हवी रामदास टेकाळे ही जामखेड येथील खेमानंद इंग्लिश स्कूल ची विध्यार्थीनी आहे. जान्हवी टेकाळे अंजली ठोंबरे मॅडम सारिका वारे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अकॅडमीच्या वतीने सारिका वारे यांना स्टार टीचर म्हणून गौरविण्यात आले.या यशाबद्दल जान्हवी टेकाळेचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
COMMENTS