Homeताज्या बातम्यामनोरंजन

जान्हवी कपूरच्या देवराचं फर्स्ट लूक पोस्टर आऊट

मुंबई प्रतिनिधी - दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर सध्या त्याच्या आगामी 'देवरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगली

एसटीच्या कर्मचार्‍यांच्या संपाला गालबोट; सुर्ली घाटात आटपाडी-कराड बसवर दगडफेक
निर्माता नाझिम हसन यांचे निधन
पोलिसांची राज्यातील सर्वात मोठी कारवाई… ३१ हजार किलो गोमांस जप्त

मुंबई प्रतिनिधी – दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर सध्या त्याच्या आगामी ‘देवरा’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. ‘देवरा’ या सिनेमातील जान्हवी कपूरचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवशी निर्मात्यांनी तिला पोस्टर शेअर करत खास भेट दिली आहे. जान्हवी कपूरच्या वाढदिवशी निर्मात्यांनी तिला खास भेट दिली आहे. जान्हवीच्या आगामी सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर निर्मात्यांनी आऊट केलं आहे. पोस्टर आऊट करत निर्मात्यांनी लिहिलं आहे,”आमची थंगम जान्हवी कपूरला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा”. 

‘देवरा’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कोरताला शिवाने सांभाळली आहे. निर्माते एप्रिल महिन्यात हा सिनेमा रिलीज करू शकतात. ज्युनियर एनटीआरचा हा सिनेमा 10 एप्रिल 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

‘देवरा’ या सिनेमात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. तर सैफ अली खानदेखील एका जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. ‘देवरा’ या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ज्युनियर एनटीआरसह दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणसोबतही जान्हवी स्क्रीन शेअर करू शकते. 

COMMENTS