Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जानाई प्रतिष्ठानने 140 कुटुंब उभे केले

लातूर प्रतिनिधी - गरजू हुषार व होतकरु विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी गेल्या 23 वर्षात श्री जानाई प्रतिष्ठानने या

भगवंताच्या नामस्मरणामुळे जीवन आनंदी बनते ः अविनाश महाराज
उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला महिनाभरात मान्यता देणार
हुंड्यासाठी होणार्‍या छळामुळे जावयाने केली आत्महत्या…

लातूर प्रतिनिधी – गरजू हुषार व होतकरु विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी गेल्या 23 वर्षात श्री जानाई प्रतिष्ठानने या प्रकारचे 23 विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि त्यातून उभा राहिलेल्या निधीतून आतापर्यंत 140 विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे तर यावर्षी 11 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी लातूर शहरातील श्री जानाई प्रतिष्ठानतर्फे या वर्षीचा सांस्कृतिक कार्यक्रम दि. 26 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला. धमाल विनोदी ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाने लातूरकरांना मनोरंजनातून मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या सुप्रसिद्ध कार्यक्रमातील कलाकार विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव आणि पॅडी कांबळे यांनी या नाटकात अक्षरश: विनोदाचा धुमाकूळ घातला. यावर्षीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून लातूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अमोल देवर उपस्थित होते. नाटकाच्या मध्यंतरात छोटेखानी स्वागताचा कार्यक्रम करण्यात आला. ज्याचे सूत्रसंचालन डॉ. ऋजुता अयाचित यांनी केले. श्री जानाई मातेच्या प्रतिमा पूजनानंतर कलाकारांचं जानाई परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम अभिनेत्री विशाखा सुभेदार, अभिनेते प्रसाद खांडेकर, अभिनेत्री नम्रता संभेराव, अभिनेता पॅडी कांबळे यांचे स्वागत श्रेया कुलकर्णी, गौरव कुळकर्णी, व्यंकटेश वाघ, कांचन इस्लामपूरे यांनी केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थापक अध्यक्ष अतुल ठोंबरे, संजय अयाचित, सुनिल अयाचित, जानाई सांस्कृतिक मंडळ सदस्य व विद्यार्थी मंडळ यांन परिश्रम घेतले

COMMENTS