Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड बाजार समितीची निवडणूक जिंकायचीच  

भाजपच्या निवडणूक रणनीती बैठकीत आ. राम शिंदे यांचा विश्‍वास

जामखेड प्रतिनिधी ः समोरचे नेतृत्व आणि पक्षावर आता कोणाचाच विश्‍वास राहिलेला नाही. सगळा बेबनाव आहे. अगामी निवडणूकांच्या दृष्टीने बाजार समितीची निव

अहमदनगर प्रधान डाकघराच्या प्रभारी सिनियर पोस्टमास्तरपदी श्री संदीप कोकाटे
पंकजा मुंडे यांनी शिर्डीत येऊन घेतले साई समाधीचे दर्शन
बाबुजी आव्हाड महाविद्यालयात राबवली स्वच्छता मोहीम

जामखेड प्रतिनिधी ः समोरचे नेतृत्व आणि पक्षावर आता कोणाचाच विश्‍वास राहिलेला नाही. सगळा बेबनाव आहे. अगामी निवडणूकांच्या दृष्टीने बाजार समितीची निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे ही निवडणूक भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने लढवणार आहे. समोरच्याने जाणीवपुर्वक बाजार समितीवर प्रशासक आणला होता. त्यामुळे आता आपल्याला बाजार समितीची निवडणूक जिंकायचीच आहे. असा ठाम विश्‍वास देत कार्यकर्त्यांनी गाफील न राहता जोमाने कामाला लागावे, असे आवाहन आ प्रा राम शिंदे यांनी केले.
जामखेड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणुकीची रणनिती ठरवण्याबरोबरच उमेदवार निवडण्यासाठी आ प्रा राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बैठकीचे आयोजन दि 26 मार्च रोजी करण्यात आले होते. बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी भाजपचे सर्व नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, अनेक गावांचे सरपंच आणि सेवा संस्थांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना आ.राम शिंदे म्हणाले की,  बाजार समितीची निवडणूक दुरंगी व्हायची का तिरंगी हे पुढचे पुढे बघू. अर्ज माघारी घेईपर्यंत काहीपण होऊ शकतं. दहा वर्षे मी सत्तेत असताना कुठेही कटुता आली नाही, कोणाची चौकशी लावली नाही, कोणाला त्रास दिला नाही, कोणाला आत टाका म्हणलं नाही, सौहार्दाच्या वातावरणात सगळ्यांना मदतीची भूमिका घेतली. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक भाजपच जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. लोकांना फार सांगायची आवश्यकता नाही, कारण लोकांना अनुभव आले आहेत. यावेळी 25 जणांवर उमेदवार ठरविण्याची जबाबदारी सोपवली. टिमनूसार काम वाटप केले आहे. एकमेकांत डोकं न लावता आपापल्या जबाबदारीवर लक्ष देऊन काम करण्याच्या सुचना आ प्रा राम शिंदे यांनी दिल्या . यावेळी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

COMMENTS