Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयहिंद लोकचळवळीच्या वतीने 21 ते 23  डिसेंबर काळात भव्य कला महोत्सवाचे आयोजन

संगमनेर : निरोगी व सुदृढ समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जयहिंद लोकचळवळीच्या वतीने मा. शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शन

शिवसेना नगरसेवकाची दादागिरी l पहा LokNews24
अवैध धंद्यांवर कर्जत पोलिसांची मोठी कारवाई
दुचाकीस्वारांना लुटणार्‍या दोघांना पकडले ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संगमनेर : निरोगी व सुदृढ समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जयहिंद लोकचळवळीच्या वतीने मा. शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विद्यार्थ्यांना व्यवसाय पूर्व कलाकौशल्याची संधी मिळावी याकरता 21 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2024 या काळामध्ये क्रीडा संकुल येथे भव्य कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये 7200 विद्यार्थ्यांचा समावेश असून हे सर्व विद्यार्थी एकाच वेळेस देशभक्तीपर गीतगायन  करणार असल्याची माहिती जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

संगमनेर येथील प्रभा निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत या कला महोत्सवा बाबत त्यांनी माहिती दिली .यावेळी समवेत बालभारतीचे विशेष अधिकारी डॉ अजयकुमार लोळगे ,प्रकाश पारखे, डॉ. नामदेवराव गुंजाळ आधी सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देताना मा. आमदार डॉ तांबे म्हणाले की, जयहिंद लोकचळवळ ही निरोगी व सुदृढ समाज निर्मितीसाठी काम करत आहे. या अंतर्गत सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांना व्यवसाय पूर्व कौशल्य मिळावे याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे 21 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2024 या काळामध्ये भव्य कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कला महोत्सवाचे उद्घाटन शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ.डॉ सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कला महोत्सवात विविध प्रकारची 20 स्टॉल असून यामधून विद्यार्थ्यांना ओरिगामी, पेपर क्विलिंग ,नारळाची करवंटी ,बुरुडकाम, पतंग तयार करणे, कॅनव्हास पेंटिंग, निसर्ग चित्र, जलतरंग ,कागदी फुलांची निर्मिती, स्क्रीन प्रिंटिंग, सौंदर्यप्रसाधने, पुष्पगुच्छ तयार करणे, रांगोळी रेखाटन, सायकल दुरुस्ती, प्रिंट मेकिंग, वारली, चित्रकला, मातीकाम, पपेट शो ,क्लास आर्ट, अक्षरलेखन, रस्ता सुरक्षा, फायर सेफ्टी, व्यसन बंदी, झुंबा, वारकरी, याचबरोबर संगणकीय प्रशिक्षण असे वेगवेगळे प्रकारचे कला कौशल्य शिकवले जाणार आहे. याकरता राज्यभरातून आणि देशभरातून तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. या तीन दिवसाच्या कला महोत्सवात तालुक्यातील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून या तीन दिवसात 7200 विद्यार्थी कला कौशल्यांचे प्रशिक्षण घेणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आयोजकांच्या वतीने साहित्य वाटप करण्यात येणार असून त्यांनी तयार केलेल्या वस्तू त्या विद्यार्थ्यांना स्वतःकडे घेऊन जाता येणार आहे. यानंतर हे सर्व 7 हजार विद्यार्थी एक ताल एक सुरात बलसागर भारत होवो, सारे जहाँ से हिंदुस्तान हमारा, आणि उधळीत शीत किरणा हे तीन देशभक्तीपर गीते एकाच वेळेस सादर करणार असल्याचे प्रकाश पारखे यांनी सांगितले. तरी या भव्य दिव्य कला महोत्सवात संगमनेर तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी प्रकाश पारखे (8888288289) या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन जयहिंद लोकचळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS