Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

35 वर्षे सोसलं… आता परिवर्तन घडवा : निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : आ. जयंत पाटील अनेक वर्षे राज्य सरकारमध्ये मंत्री होते. त्यांच्याकडे मोठं मोठी खाती होती. परंतु त्यांना मतदार संघाचा विक

सावंतवाडीत आठवड्यापासून बिबट्याचा मुक्काम
साडेतीन वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने आईनेच काढला काटा; दोघांवर गुन्हा दाखल
कर्मकांडांना फाटा देत महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचाराने रक्षाविसर्जन

इस्लामपूर / प्रतिनिधी : आ. जयंत पाटील अनेक वर्षे राज्य सरकारमध्ये मंत्री होते. त्यांच्याकडे मोठं मोठी खाती होती. परंतु त्यांना मतदार संघाचा विकास साधता आला नाही. आशा या अकार्यक्षम लोकप्रतिनिधीला तुम्ही 35 वर्षे सोसलं आहे. परंतु आता परिवर्तन घडवण्याची वेळ आली आहे. या बदलाच्या लढाईत मला साथ द्या, असे आवाहन, इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील साखराळे (ता. वाळवा) येथे प्रचार दौर्‍यादरम्यान ते बोलत होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, गेल्या 55 वर्षांपासून एकाच घरात सत्ता आहे. परंतू या मतदार संघातील मूलभूत प्रश्‍न सुटलेले नाहीत. पाणंद रस्त्यांसह अन्य प्रश्‍न प्रलंबित आहेत. तसेच मतदार संघातील तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी जयंत पाटील यांनी ठोस पाऊले उचलली नाहीत. ही या मतदार संघातील लोकांची शोकांतिका आहे. मी महायुती सरकारच्या माध्यमातून इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. त्यातून अनेक वर्षे प्रलंबित असणारी गावातील अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, काँक्रीटीकरण, मुरमीकरण, आरसीसी गटर, मुरुमीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, आदी कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जनतेसमोर कोणत्या तोंडाने मते मागायला जायचे, असा प्रश्‍न आ. जयंत पाटील यांच्यासमोर आहे. यावेळी परिवर्तन अटळ आहे. फक्त तुमची साथ हवी.
उपोषणाची वेळ दुर्देवी
आज साखराळे गावात कारखाना,साखराळे गावात मतदान, साखराळे ग्रामपंचायत मध्ये सत्ता तरी ग्रामस्थांना या गावात न्याय हक्कासाठी उपोषण, आंदोलन करावे लागते हि एक प्रकारची हुकुमशाही आहे. ती लोकशाही मार्गाने मोडून काढण्याची हि वेळ आहे. तुम्ही दबावाला बळी न पडता स्वाभीमानाने पुढे या व परीवर्तन घडवा. येणारे दिवस हे सन्मानाचे असतील. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहेबांचे एकाच गावात चार गट
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदारांनी गेले 35 वर्षे मतदार संघाचा विकास कमी पण आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकाच गावात चार गट करण्यावर भर दिला. परंतू त्यांच्या या भूमिकेमुळे तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य माणूस भरडला गेला. गावातील गटा-तटाच्या राजकारणामुळे खर्‍या अर्थाने अनेक गावांचा विकास खुंटला गेला, असेही निशिकांत भोसले-पाटील म्हणाले.

COMMENTS