Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून इतर कामे देणे चुकीचे

शिक्षणमंत्री व शिक्षण आयुक्तांने लक्ष देण्याची गरज

लोहा प्रतिनिधी - शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून इतर अशैक्षणिक कामे देणे म्हणजे  काम छोडो बिल्ली हाकालो असा कारभार झाला असुन याकडे शिक्

पुणे प्रादेशिक सा.बां.विभागात निविदा घोटाळ्यांचा उच्चांक
धारूर घाटात ट्रकचा अपघात
जिल्हास्तरीय कुष्ठरोग निबंध स्पर्धेत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील स्वप्नाली चव्हाण हिला प्रथम तर राहुल गडेराव याला द्वितीय पारितोषिक

लोहा प्रतिनिधी – शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून इतर अशैक्षणिक कामे देणे म्हणजे  काम छोडो बिल्ली हाकालो असा कारभार झाला असुन याकडे शिक्षणमंत्री दिपक केसरकर व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी लक्ष देऊन शिक्षकांकडून शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणी व्यतिरिक्त इतर कामे देऊ नये अशी मागणी पालकातुन व शिक्षकांकडून होत आहे.
शिक्षक हा देशाचे भवितव्य घडविणारा व्यक्ती असुन विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देतो. व देशाची उज्जव पिढी घडवतो ,परंतु आपल्या जिल्ह्यासह राज्यात वेगळंच परिस्थिती असुन, इतर कामे देवून जिल्हा परिषदेच्या शिक्षण प्रणालीवरील प्रश्नचिन्ह उत्पन्न होत असुन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोर गरीब शेतकरी,, शेतमजूर , सामान्य माणसाचे लेकरे हे जिल्हा परिषदेच्या शासकीय  शाळेत शिक्षण घेत असतात धनदांडगे ,पुढारी, अधिकारी, कर्मचारी यांचे मुले हे श्रीमंत शिक्षण सम्राटांच्या शाळेत तालुक्यावर, जिल्ह्यावर , महानगरात शिक्षण घेत असतात  त्यामुळे शासणाच्या गरिबाला मोफत चांगलें शिक्षणाचा पुरता फज्जाच उडाला त्यातच  दुष्काळात तेरावा महिना म्हणल्याप्रमाणे  जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना शासन विविध सर्वेक्षण,मतदार यादी बनविने,बीएलओ पदी नियुक्ती करणे,निवडणूक,स्वच्छता मोहीम राबवने,निरक्षर लोकांचा सर्वे स्थलांतर विद्यार्थी सर्वे,अपंग विद्यार्थांचा सर्वे,शा.पो,आहार वाटप करणे आदी विविध कामे लावीत आहेत.  त्यामुळे त्यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. पूर्वी जिल्हा परिषदेचे शिक्षक हे विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण शिकवून गुणवत्ता वाढीसाठी जादा वर्ग घेत  असे पण आता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना  काहीवेळा दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करता येईना झाला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात गोरगरिब विद्यार्थ्यी हे मागे राहत आहेत. तेव्हा याकडे राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी लक्ष देऊन  शिक्षकांकडून सर्व अशैक्षणिक कामे तथा,मतदार यादी, बीएलओ आदी कामे काढून घ्यावी अशी मागणी जनतेतून व शिक्षकांकडून होत आहे.
शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांची प्रतिक्रिया
शाळा सुरू 15 जून जुलै ते 20 जुलै सेतू अभ्यासक्रम,पूर्वचाचणी उत्तर चाचणी21 जुलै ते 20 ऑगस्ट घरोघरी जाऊन मतदार नोंदणीशिष्यवृत्ती नवोदय परीक्षा शाळेतील सराव चाचण्या बीटस्तरावरील चाचण्या17 ऑगस्ट ते 16 ऑगस्टपायाभूत चाचणी व त्याचा निकाल हे संपत नाही तर 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट निरक्षर सर्वेक्षण,शाळाबाह्य विद्यार्थी सर्व्हेक्षण शाळा नाही चालली तर शिक्षक जबाबदार
गुणवत्ता नाही वाढली तर शिक्षक जबाबदार ,पट कमी झाला तर गुरुजी जबाबदार जिल्ह्यातील हजारो शिक्षक शिक्षणेत्तर कामामुळे किमान अडीच महिने शाळे बाहेर आहेत . मग ,जिल्हा परिषदेच्या शाळा कशा टिकतील? गुणवत्ता कशी वाढेल.?असा प्रति प्रश्न त्यांनी केला.

COMMENTS