Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांब्यावरून तालुक्याला जाण्यासाठी बस नसणे दुर्देवी

नागरिकांचा संताप राजकीय पुढार्‍यांचे मात्र दुर्लक्ष

पुणतांबा ः राहता तालुका अस्तित्वात येऊन 24 वर्षांचा कालावधी झाला तरी पुणतांब्याहून तालुक्याला जायला बस नाही, हे दुर्दैव आहे. तालुक्याच्या ठिकाणी

संजीवनीची सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी
मुळातून शेतीसाठी आवर्तन सोडा अन्यथा शेतकर्‍यांसह घेणार धरणात जलसमाधी
लाडकी बहीण योजनेचा सर्व भगिनींनी लाभ घ्यावा

पुणतांबा ः राहता तालुका अस्तित्वात येऊन 24 वर्षांचा कालावधी झाला तरी पुणतांब्याहून तालुक्याला जायला बस नाही, हे दुर्दैव आहे. तालुक्याच्या ठिकाणी जायला बस सेवा नसल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून राजकीय पुढार्‍यांचे आकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

1999 मध्ये राहता तालुका अस्तित्वात झाला पुणतांबा राहता तालुक्यात विधानसभेला कोपरगाव मतदार संघ अशी परिस्थिती गावाची असून राहता तालुक्यातील सर्वात मोठे गाव तसेच चळवळीचे गाव म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे त्याच गावात तालुक्यात ठिकाणी जायला बस नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल लोकसभा विधानसभा निवडणुका येऊन जातात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात त्यात आश्‍वासन दिले जाते तालुक्याच्या ठिकाणी जायला बस सेवा सुरू करू मात्र त्या आश्‍वासनावरच पुणतांबेकर जगत आहे. स्थानिक पदाधिकारी व प्रवासी संघटना यांची देखील याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्वसामान्य पुणतांबेकारांनी नाराजी व्यक्त केली आहे बस सेवा बाबत राजकीय पुढार्‍यांचे दुर्लक्ष असल्यामुळे बस सेवेचा प्रश्‍न सुटत नाही रा त्याला तालुक्याचे ठिकाणी ग्रामस्थांना जावे लागते शिर्डी मार्गे किंवा कोपरगाव मार्गे जावे लागते त्यामुळे प्रवाशांचा वेळ व आर्थिक फटका बसतो. पंचायत समिती व न्यायालय कामकाज तसेच इतर शासकीय कामासाठी राहत्याला जावे लागते पुणतांबा थेट बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो लोकप्रतिनिधी यांनी देखील या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले असून पुणतांबाच्या राजकीय नेतृत्वाने यावर आवाज उठवायला पाहिजे मात्र तो आवाज उठवला जात नाही इतर प्रश्‍नासाठी आंदोलने होतात तर बस सेवेसाठी का होत नाही हा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा आहे. पुणतांबा शेतकरी संपामुळे देशात गाजले त्याच गावात तालुक्याच्या ठिकाणी जायला बस नाही ह आमची दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आल्यावर आश्‍वासन दिले जातात त्या आश्‍वासनाची कृती होत नाही गावाला कोणी वाली राहिला का नाही परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांसमोर उभे आहे. पुणतांबा शिर्डी हा रस्ता चांगला झाला असून शिर्डी मार्गे सुद्धा बस सेवा सुरू होऊ शकते मात्र त्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. पुणतांबा राहता बस सेवा बरोबरच शिर्डी औरंगाबाद पूर्ववत गाडी सुरू करावी कोपरगाव अहमदनगर बस सुरू होती ती बस देखील बंद झाली आहे. बस सेवेच्या प्रश्‍नाबाबत लवकरच ग्रामस्थांचे सर्वसामान्य शिष्ट मंडळ जिल्हा विभाग नियंत्रक यांना भेटणार आहे. 

COMMENTS