Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वय झाले, आतातरी थांबणार की नाही ?

अजित पवारांचा थेट शरद पवारांना सवाल

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात बुधवारी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाची यशवंतरावच चव्हाण सेंटरवर तर, अजित पवार गटाच्या पदाधिकार्‍यांची सभा भुजबळ महाविद्या

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभाग घ्यावा
पूरग्रस्तांना 10 हजाराची मदत
अजित पवारांच्या अडचणीत वाढ; राज्य बँक घोटाळ्याची ’पीएमएलए’ कोर्टाकडून दखल

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात बुधवारी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाची यशवंतरावच चव्हाण सेंटरवर तर, अजित पवार गटाच्या पदाधिकार्‍यांची सभा भुजबळ महाविद्यालयात पार पडली. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीकेची तोफ डागली. आपण आमचे श्रद्धास्थान आहात, दैवत आहात, मात्र वय झाल्यानंतर कुठेतरी थांबण्याची गरज असतांना, आपला हट्टीपणा न सोडता आणि नेहमी आपल्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेत मला व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा थेट आरोप अजित पवार यांनी बुधवारी केला.
पक्षाला राज्यात नंबर वन बनण्याची संधी होती, त्यासाठी मुख्यमंत्रिपद बनण्याची संधी होती, मात्र दोनदा ही संधी गमावण्यात आली. शरद पवारांनी वसंत पाटलांना बाजूला सारून मुख्यमंत्रीपद मिळवले. तेव्हापासून नागरिकांनी त्यांची साथ दिली. पण प्रत्येकाचा एक काळ असतो. आता त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाऊन आराम करावा. आपला हट्टीपणा सोडावा, असेही ते यावेळी म्हणाले. ही वेळ आपल्यावर का आली, शरद पवार हे आपले श्रद्धास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे स्वराज्य आपल्याला तयार करता आले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. वसंत पाटील यांचे सरकार बाजूला सारले आणि सरकार स्थापन केले. शरद पवारांनी अनेक पक्ष काढले आणि त्यांना लोकांनी राज्याच्या राजकारणात योग्य स्थान दिले. 1986 ला समाजवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलिन केले, त्यांनापद मिळाले नाही, पण त्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळाले. केंद्रात मंत्रिपद मिळाले. 1978 पासून शरद पवारांनी लोकांनी साथ दिली आहे. प्रत्येकांचा एक काळ असतो असे म्हणत अजित पवारांनी मोठे विधान केले आहे. अजितदादांनी विलिनिकरणांचा इतिहास सांगितला आहे. मी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही असे म्हणत शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले की, सोनिया गांधी परदेशी असल्याचा मुद्दा पुढे करण्यात आला आणि काही दिवसांनी त्यांच्यासोबत काम केले असे सांगताना अजित पवार सांनी शरद पवार यांचा राजकीय प्रवास सांगत खोचक टोला लगावला आहे.2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संधी आली होती तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडण्यात आले नाहीतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री राज्यात राहिला असता. 2022 वेळाही संधी आपण सोडली असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, यावेळी अजित पवारांसोबत 32 आमदार या बैठकीला उपस्थित असल्याचा दावा करण्यात येत आहे.

मला व्हिलन ठरवण्याचा नेहमीच प्रयत्न – 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका घेण्यात आल्याचा दावा अजित पवारांनी केला. मी महाराष्टाला कधी खोटे बोलणार नाही, खोटे बोलेल तर मी पवारांची औलाद असल्याचे सांगणार नाही म्हणत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा केली. पण मला सांगण्यात आले कुणाला काही सांगायचे नाही असे सांगून मला शासंत केले. 2017 ला शिवसेना जातीयवादी वाटत होती म्हणून भाजपसोबत न जाण्याची भूमिका मोठ्या नेत्यांनी घेतली आणि नंतर शिवसेनेसोबत जात भाजप जातीयवादी कसे वाटले. मी उद्धव ठाकरेंना सांगितले होते की शिवसेनेत नाराजी आहे, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा दावाही त्यांनी केला आहे.

भाजपसोबत जाण्यासाठी यापूर्वीच 5 बैठका – अजित पवार म्हणाले की, 2019 मध्ये भाजपसोबत 5 बैठका झाल्या होत्या. मात्र तेव्हा पुढे बोलण्यासाठी जाऊ दिले नाही. असे म्हणत अजित पवारांनी भाजपसोबत जाण्यासाठी सर्व आमदारांची तयाार होती पण मध्येच भूमिका बदलण्यात आली. भाजपमध्ये 75 व्या वर्षी रिटार्यमेंट घेतली असे म्हणत अजित पवार म्हणाले की शरद पवार 83 वर्षांचे झाले आता थांबणार कधी, त्यांनी आता सल्लागार व्हायला हवे, असे म्हणत शरद पवार यांनी थांबयला हवे असे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

मीही पुस्तक लिहिणार ः प्रफुल्ल पटेलांचा इशारा – शरद पवार यांचे अत्यंत विश्‍वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हेदेखील अजित पवारांबरोबर गेले आहेत. पटेल यांनी शरद पवारांची साथ कशी काय सोडली? असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. यावर आज स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केले. तसेच त्यांनी शरद पवारांकडे पाठिंबादेखील मागितला आहे. यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, मी एक सौम्य व्यक्ती आहे, त्यामुळे मी खूप कमी बोलतो. कमीच बोललेले बरे. कारण मलाही एक दिवस माझे पुस्तक लिहायचे आहे, पुस्तक लिहिण्याची वेळ येणार आहे. हे पुस्तक जेव्हा प्रफुल्ल पटेल लिहिणार त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला काय काय समजेल हे मला सांगायची अजिबात इच्छा नाही, किमान आज तरी तशी इच्छा नसल्याचे पटेल यांनी केले आहे.

COMMENTS