इतिहासतज्ज्ञ डॉ. उमा चक्रवर्ती यांचे प्रतिपादनछ. संभाजीनगर: हैदराबाद मुक्तीसंग्रामात मराठवाड्यातील स्त्रियांनी दिलेले योगदान दिले आहे. यासंदर्भात

इतिहासतज्ज्ञ डॉ. उमा चक्रवर्ती यांचे प्रतिपादन
छ. संभाजीनगर: हैदराबाद मुक्तीसंग्रामात मराठवाड्यातील स्त्रियांनी दिलेले योगदान दिले आहे. यासंदर्भात व्यापं व्यापक प्रमाणावर इतिहास लेखन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रख्यात इतिहास तज्ज्ञ डॉ उमा चक्रवर्ती यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, -ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र द्वारा तथा पीएम -उषा (मेरू) 2025-26, योजनेच्या अर्थसहाय्याने मराठवाड्यातील स्त्रियांचे योगदान आणि आव्हाने या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
बीजभाषण डॉ. उमा चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले की, भारतीय चळवळीत स्त्रियांचे योगदान हें महत्वाचे आहे. महाराष्ट्रात समाज सुधारणा चळवळीचा मोठा इतिहास आहे सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे यांनी मोठं कार्य केलेला आहे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेलं आहे. मराठवाड्यात हैदराबाद मुक्तीसंग्रामात स्त्रियांनी दिलेले योगदान दिले तसेच नामांतर चळवळीतही स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग व योगदान दिले आहे असे असले तरी त्यांची नोंद पुरेशा प्रमाणात झालेली नाही ते अधोरेखित झालेले दिसत नाही. मराठवाड्यात ज्या चळवळी झाल्यात त्या चळवळीचा इतिहास व स्त्रियांच्या सहभागा चा व योगदानाचा इतिहास लिहिणे आवश्यक आहे. स्त्रियांचा सहभाग महत्वाचा होता. तसेच स्त्रियांप्रति सामाजिक वास्तविकता समजून घेणे आजही महत्वाचे आहे. सामाजिक, आर्थिक व राजकीय अधिकारांच्या संदर्भात आजही चिंतन करण्याची गरज आहे. राष्ट्रीय चर्चासत्रात दुसर्या सेशन मध्ये सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांनी मराठवाड्यातील स्त्री चळवळ आणि माध्यमांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना खिवंसरा यांनी स्पष्ट केले कि मराठवाड्यातील गायरान चळवळ असो अथवा नामांतर लढा स्त्रियांनी दिलेले योगदान पाहिजे तेवढ्या प्रमाणात माध्यमांतून अधोरेखित झालेले दिसत नाही. डॉ. रश्मी बोरीकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात महिलांचा सहभाग या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉ.रश्मी बोरीकर यांनी स्पष्ट केले कि स्वतंत्र भारतात मराठवाडा स्वतंत्र नव्हता. निजामाच्या राजवटीत मराठवाड्यातील जनता जगत होती. व याकाळात अनेक महिलांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात आपले योगदान दिले आहे.
चर्चासत्राचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अश्विनी मोरे यांनी केले. उदघाट्न व समारोप सत्राचे सूत्रसंचालन केंद्राच्या डॉ. सविता बहिरट यांनी केले. तर दुसर्या व तिसर्या सत्रात केंद्राच्या विद्यार्थिनी अनुक्रमे प्रिया झोरे व राजर्षी लांडगे यांनी सूत्रसंचलन केले. प्रस्तुत चर्चासत्रात प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. यावेळी केंद्रातील प्रा. डॉ. निर्मला जाधव, डॉ.सविता बहिरट तसेच श्री. संतोष लोखंडे, संजय पोळ यांची उपस्थिती होती.

COMMENTS