Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्तृत्ववान स्त्रियांचा इतिहास जाणून घेणे आवश्यक ः न्यायाधीश संजना जागुष्टे

शेवगाव तालुका ः शेवगाव येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिल

कांदा विक्रीचे तब्बल दीड कोटी बुडवले…गुन्हा दाखल
शेतमाल चोरी करणारे आरोपी 12 तासात जेरबंद
राहुरी खुर्द परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यात यश

शेवगाव तालुका ः शेवगाव येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त शेवगाव येथील क. स्तर दिवाणी न्यायाधीश संजना जागुष्टे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. 8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. हाच दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे आणि याच दिनी अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो, असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो. आजच्या स्त्रीमध्ये प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याचे सामर्थ्य, शक्ती आहे. सध्या समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो त्यामुळे गरज आहे ती फक्त जिद्दीने आपले ध्येय साध्य करण्याचे आपला बहुमुल्य वेळ वाया न घालवता मिळेल त्या संधीचे सोने करा आणि समाज माध्यमांचा उपयोग चांगल्या कामासाठी करा असा सल्ला न्यायाधीश संजना जागुष्टे यांनी विद्यार्थांना केला.
त्याचबरोबर जागतिक महिला दिनाच्या क्रांतीचा उहापोह केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी अध्यक्षीय मनोगतातून आपल्याकडे समाजामध्ये लहानपाणापासून मुलींवर व मुलांवर जे संस्कार केले जातात त्यात फरक दिसून येतो तो कुठे तरी बदल झाला पाहिजे असे मत मांडले. यावेळी महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम अधिकारी डॉ. गोकुळ क्षीरसागर यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, कार्यक्रम अधिकारी डॉ. उषा शेरखाने, ग्रंथपाल प्रा. मिनाक्षी चक्रे, डॉ. छाया भालशंकर,अजय नजन, अ‍ॅड. ज्ञानेश्‍वर गाडेकर, अ‍ॅड. अजय मोहिते व मोठ्या संख्येने महाविद्यालयातील महिला प्राध्यापक आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विठ्ठलराव देवढे यांनी केले तर आभार डॉ. रवींद्र वैद्य यांनी मानले.

COMMENTS