Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वच क्षेत्रात तरबेज असणे गरजेचे ः चैतालीताई काळे

कोपरगाव प्रतिनिधी : मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगावने बिजनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव

हुमणी किडीचा वेळीच बंदोबस्त करा ः भरत दवंगे
आगडगाव काळभैरवनाथ देवस्थान परिसरात पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय
श्रीगोंद्यात खा. निलेश लंके यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी : मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगावने बिजनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्यातील कला गुणांना विकसित होण्यास मदत होणार आहे. पालकांनी देखील मुलांवर अभ्यासाचे अधिकचे दडपण न देता त्यांच्या आवडीचे छंद जोपासले पाहिजे. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी सर्वच क्षेत्रात तरबेज असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांनी केले.
लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव आयोजित ’कोपरगाव बिजनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्या स्पर्धकांचा व प्रायोजकांचा सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्या बोलत होत्या.  यावेळी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सयाजीराव कोर्‍हाळे, दिवाणी न्यायाधीश भगवान पंडित, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, माजी जि.प.सदस्य राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, प्रसाद भास्कर, प्रशांत भास्कर, संजय उदावंत, आकाश नागरे, शिंदे इंग्लिश आप्पासाहेब शिंदे, सौ. निता शिंदे, आरती माकुणे, श्रीरामपूर लायन्स क्लबचे सुनील साठे, प्रविण गुलाठी, भरत ओझा, अजित अरबट्टी, लायन्स क्लबचे अध्यक्ष परेश उदावंत, सेक्रेटरी बाळासाहेब जोरी, खजिनदार अंकुश जोशी, लिनेस क्लबच्या प्रेसिडेंट डॉ. वर्षा झंवर, अध्यक्षा डॉ. अस्मिता लाडे, सेक्रेटरी अंजली थोरे, खजिनदार नेहा बत्रा, लिओ क्लबचे अध्यक्ष सुमित सिनगर, सेक्रेटरी धिरज कराचीवाला, खजिनदार यश बंब, एक्स्पो कमिटी सदस्य राजेश ठोळे, संदीप कोयटे, संदीप रोहमारे आदींसह लायन्स, लिनेस व लिओ क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तिला दिली आईच्या मायेची ऊब – बिझनेस एक्स्पोमध्ये आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना चैतालीताई काळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यावेळी विजेत्या स्पर्धकांबरोबर त्यांचे आई वडील देखील पारितोषिक  स्वीकारण्यासाठी रंगमंचावर येत होते. मात्र एका विजेत्या मुलीला चैतालीताई काळे यांच्याकडून बक्षीस स्वीकारताना आपल्या समवेत आपली आई नोकरी करीत असल्यामुळे पारितोषिक स्वीकारण्यासाठी हजर राहू शकली नाही हे सांगताना तिचे डोळे पाणावले होते. त्यावेळी चैतालीताई काळे यांनी तिला प्रेमाने जवळ घेतले. त्यावेळी त्या मुलीला देखील आपण आपल्या आईच्याच कुशीत विसावलो असल्याची जाणीव झाली व तिला आईच्या मायेची उब मिळाली. त्यावेळी मात्र चैतालीताई काळे यांच्या देखील डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थित प्रेक्षक देखील काही क्षणासाठी स्तब्ध झाले होते.

COMMENTS