Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑलम्पिक स्पर्धेसाठी खेळाचा ध्यास घेणे गरजेचे

आंतरराष्ट्रीय फुटबॉल शंखवाळकर यांचे आवाहन

कोपरगाव शहर ः राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरिल होणार्‍या  क्रीडा स्पर्धात सहभागी होण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी  भरपुर मेहनत घेत सात

निरंकारी मिशनच्या वतीने आज वृक्षारोपण व स्वच्छता अभियान
नात्याला काळिमा…काकाने केला पुतणीचा विनयभंग
संत गोदड महाराजांच्या नगरीत अतिरेक चालत नाही : आ. प्रा. राम शिंदे

कोपरगाव शहर ः राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरिल होणार्‍या  क्रीडा स्पर्धात सहभागी होण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी  भरपुर मेहनत घेत सातत्याने मैदानाचा ध्यास घेतला पाहीजे तरच त्यांचा सर्वांगिण विकास होईल असे प्रतिपादन भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार, अर्जुन पुरस्कार सन्मानित ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत आयोजित जागतिक ऑलम्पिक दिन कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना ऑलम्पिक स्पर्धेची  माहीती देत खेळाडुंनी आपल्या आवडत्या खेळात नैपुण्य मिळवावे असा मौखिक सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
या प्रसंगी टोकिओ ऑलिंपिक निरिक्षक अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके, क्रीडा शिक्षक अनिल काले, अनिल अमृतकर, दिलीप कुडके, अतुल कोताडे, रघुनाथ लकारे, रेवती तुपकर, कल्पना महानुभाव आदी शिक्षक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.तर  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मकरंद कोर्‍हाळकर यांनी सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक निलेश बडजाते यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मानले. श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप कुमार अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, संदीप अजमेरे, आनंद ठोळे, डॉ.अमोल अजमेरे, राजेश ठोळे आदीनी जागतिक ऑलम्पिक दिनानिमित्त सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
     

COMMENTS