Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे ः भानुदास मुरकुटे

श्रीरामपूर  : विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात देशी विदेशी सर्व खेळामध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये

साहित्यातूनच शेतकरी आणि दलितांना उभे राहण्याचे सामर्थ्य मिळाले  
यापूर्वी शेतमालाचे पेमेंट 24 तासाच्या आत का दिले नाही? भरत बोरणारे
केंद्र शासनाच्या बी.एस.एन.एल संचालक मंडळावर विधीज्ञ रवींद्र बोरावके यांची निवड

श्रीरामपूर  : विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात देशी विदेशी सर्व खेळामध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये नैपुण्य मिळवावे. त्याचबरोबर दैनंदिन जीवनात व्यायामाला महत्व दिले तर आरोग्य देखील चांगले राहते. तसेच अशोक शैक्षणीक संकुलामध्ये सर्व सुविधायुक्त, परिपूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने भविष्यात विविध उद्योगामध्ये व कंपनीमध्ये नोकर्‍या प्राप्त करून देणे हा उद्देश आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी व इतरांना स्फूर्ती मिळावी याकरिता गुणगौरव करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.

          कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अशोक पॉलिटेक्निक, अशोक कॉलेज ऑफ फार्मसी, भास्करराव गलांडे पाटिल आयटीआय, अशोक इंग्लिश मेडियम स्कूल, अशोक आयडियल स्कूल या शैक्षणिक संकुलामधील परीक्षेमध्ये विशेष नैपुण्य संपन्न केलेल्या विद्यार्थी व पालकांचा कौतुक सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार भानुदास मुरकुटे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या कृषी सहाय्यक संचालक सौ. मनीषा कार्ले, जामगावचे सरपंच आप्पासाहेब माने, जामगाव सोसायटीचे चेअरमन अशोक माने उपस्थित होते. मुरकुटे पुढे म्हणाले की, या संकुलामध्ये मुलींची सुरक्षितता व स्वतंत्र मुला मुलींचे वसतिगृह, खानावळ तसेच ग्रामीण व शहरी भागातून येण्याकरिता मोठ्या प्रमाणावर स्कूल बसेसची व्यवस्था आदी सुविधा असल्यामुळे अशोक नावारुपास आले आहे, असे श्री. मुरकुटे यांनी म्हटले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अशोक शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे म्हणाल्या की, परीक्षेमध्ये यश संपादन केल्यामुळे कौतुकाची थाप म्हणून अशोक शैक्षणिक संकुलामार्फत दरवर्षी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येत असतो. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील जीवनात ऊर्जा मिळते. यावर्षीपासून बी. फार्मसी सुरु होणार असून तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे या सारख्या शहरात न जाता जवळील भागात प्रवेश निश्‍चित केल्यास फायदा होईल, अशी अपेक्षा मुरकुटे यांनी व्यक्त केली.अध्यक्षीय सूचना पॉलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापू शिंदे यांनी तर अनुमोदन आयटीआयचे प्राचार्य रईस शेख यांनी मांडले. आभार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. सुनिता गायकवाड यांनी मांडले. फार्मसीचे प्राचार्य प्रसाद कोते, इंग्लिश मिडिअमचे प्राचार्य संपत देसाई यांनी महाविद्यालयाची माहिती दिली. यावेळी सिद्धी कार्ले हिने दहावी सीबीएससी परीक्षेत 98.60 टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. यावेळी अशोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडिराम उंडे, अशोक कारखान्याचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे, अशोक कारखान्याचे संचालक हिम्मतराव धुमाळ, भाऊसाहेब उंडे, सोपानराव राऊत, बाबासाहेब आदिक, आदिनाथ झुराळे, विरेश गलांडे, योगेश विटनोर, कार्यकारी संचालक संतोष देवकर, कारेगाव भागचे संचालक गिताराम खरात, शिवाजी मुठे, संजय लबडे, पतपेढीचे चेअरमन भाऊसाहेब दोंड, पर्सनल मॅनेजर लव शिंदे, वैद्यकिय अधिकारी डॉ. मंगेश उंडे, रोहन डावखर, संदिप डावखर, कैलास भागवत आदींसह पालक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप खंडागळे यांनी केले.

COMMENTS