Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गृहनिर्माण प्रकल्पात ज्येष्ठांना विशेष सुविधा देणे बंधनकारक

मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पात विकासकांना आता यापुढे ज्येष्ठ नागरिकांचा विचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊनच

मौजमजेसाठी दुचाकी वाहन चोरणार्‍याला अटक
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल
प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाचा टीझर रिलीज

मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पात विकासकांना आता यापुढे ज्येष्ठ नागरिकांचा विचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊनच प्रकल्पाची, इमारतीची रचना, बांधकाम करणे विकासकांना आवश्यक असणार आहे. महारेराने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ज्येष्ठांचा विचार करून प्रकल्पात काय असावे यासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वाचा मसुदा महारेराने जाहीर केला आहे. या निर्णयाची लवकरच अमलबजावणी होणार आहे.
सेवानिवृत्तीनंतर अनेक जण गावी वा निसर्गरम्य ठिकाणी जाऊन शांततेत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतात. हीच बाब लक्षात घेत विकासक विविध ठिकाणी खास ज्येष्ठांसाठी, सेवानिवृत्त नागरिकांसाठी घरे बांधतात, प्रकल्प राबवितात. मात्र अनेकदा ज्येष्ठांच्या गरजा लक्षात न घेत प्रकल्प उभारले जात असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले असून महारेराने याची गंभीर दखल घेतली आहे. ज्येष्ठांचे प्रकल्प कसे असावेत यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने आदर्श मार्गदर्शक तत्वे यापूर्वीच जारी केली आहेत. राज्यांच्या विनियामकांनी त्यांच्या राज्यात याबाबत उचित पावले उचलावी असे त्यांनी सुचविले आहे. यानुसार महारेराने यात ज्येष्ठांच्या गरजांनुसार  इमारतींशी संबंधित सर्वच अंगांचा सांगोपांग विचार करून तरतुदी सुचविल्या आहेत. विकासकाकडून होणारी ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी महारेराने मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्याबाबतच्या सूचना-हरकती 29 फेब्रुवारीपर्यँत सादर करता येणार आहेत. त्यानंतर या सूचना- हरकतींचा विचॅट करून अंतिम आदेश जारी केले जाणार आहेत. आदेश लागू झाल्यानंतर विकासकांना या तरतुदींचा विक्रीकरारात योग्य पध्दतीने समावेश करावा लागेल. हे विशिष्ट प्रकल्प या आदर्श मार्गदर्शक तत्त्वानुसारच बांधावे लागतील. इमारतीचे संकल्पचित्र,  हरित इमारत तत्वे , उद्वाहन आणि रॅम्पस, जिना, अनेक सदनिकांना जोडणारा छिन्नमार्ग,  प्रकाश योजना आणि हवा खेळती ठेवण्यासाठी वायुवीजन सुरक्षा आणि सुरक्षितता याबाबत कुठल्या बाबतीत कशी काळजी घ्यावी, याचे स्पष्ट मार्गदर्शन मसुद्यात करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिक या गृहनिर्माण प्रकल्पात प्रत्यक्षात राहायला गेल्यानंतर त्यांना अपेक्षित  सोयी-सुविधा उपलब्ध असाव्यात, हा महारेराचा हेतू आहे. सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विनियामक तरतुदी करण्याबाबत पुढाकार घेणारे महारेरा हे पहिलेच प्राधिकरण आहे. यातील तरतुदीमध्ये एका मजल्यापेक्षा जास्त मजल्याच्या इमारतीला लिफ्ट असावी, इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागात व्हीलचेअरवर कुठल्याही अडथळ्याशिवाय फिरेल असे आरेखन असावे, आवश्यक तेथे रॅम्पसची व्यवस्था असावी, त्यादृष्टीने दरवाजेही 900 एमएमपेक्षा मोठे असावे. प्राधान्याने स्लायडिंगचे दरवाजे असल्यास उत्तमच,  दरवाज्याचे हँडल्स, कड्या सहजपणे व्यवस्थित पकडता येतील असे आणि दणकट असावे. यातील फर्निचरही वजनाला हलके, दणकट आणि कुठल्याही अणकुचीदार टोकांशिवाय असावे. याशिवाय सर्व लिफ्टला द्रृकश्रव्य व्यवस्था असावी. या लिफ्टमध्ये व्हीलचेअर  सहजपणे आत-बाहेर करता यावी.

COMMENTS