Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किशोर वयीन मुलांचे मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे: डॉ. दीपा जोशी

नाशिक : शारिरीक वाढ, वाढीचे टप्पे कसे ओळखावे, शारीरिक वाढीबरोबर बौध्दिक वाढ तितकीच महत्वाची आहे, मुलांचे वाढीचे टप्पे वेळेवर येत नसेल तर बालरोगतज

पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा फलदायी…. मिळाला १५७ वस्तूंचा खजिना…
बेकिंग व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल
हलगर्जीपणाचे बळी

नाशिक : शारिरीक वाढ, वाढीचे टप्पे कसे ओळखावे, शारीरिक वाढीबरोबर बौध्दिक वाढ तितकीच महत्वाची आहे, मुलांचे वाढीचे टप्पे वेळेवर येत नसेल तर बालरोगतज्ज्ञ यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे  असे प्रतिपादन डॉ. दीपा जोशी यांनी केले. 

माहेरघर भिशी ग्रुप तर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ दीपा जोशी मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

यावेळी डॉ.जोशी म्हणाल्या की, मुलांचे लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या परिस्थितीत फ्लू ची साथ असल्याने त्यावरील लसीकरण करणे गरजेचे आहे . किशोर वयीन मुलांचे मानसिक आरोग्य कसे सांभाळावे, त्यांच्याशी सुसंवाद करणे, मोबाईल आणि इंटरनेट यांचा उपयोग विधायक कार्यासाठी करावा . वय वर्ष 9 ते 45 वर्ष वयोगटातील मुली आणि महिलांना   गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यासाठी असलेली लस (HPV vaccine) यासंबधी माहिती दिली आणि ही लस 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना देण्याने होणारे फायदे समजावून सांगितले. बालकांचा संतुलित आहार यावर मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

COMMENTS