मुंबई / प्रतिनिधी : नवर्याला पुराव्याशिवाय स्त्रीलंपट, दारूडा म्हणणे ही क्रुरता आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. पुण्यातील एक
मुंबई / प्रतिनिधी : नवर्याला पुराव्याशिवाय स्त्रीलंपट, दारूडा म्हणणे ही क्रुरता आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. पुण्यातील एका जोडप्याच्या घटस्फोटाच्या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे.
नितीन जामदार आणि शर्मिला देशमुख या न्यायमूर्तींच्या पीठाने हा निकाल दिला आहे.
पुण्यातील 50 वर्षांची महिला आणि तिचा नवरा यांच्यातील घटस्फोटाचा खटला पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात सुरू होता. या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाला मान्यता दिली. याविरोधात महिलेने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ही सुनावणी सुरू असताना पतीचे निधन झाले. त्यामुळे पतीचे वारस यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
या महिलेने याचिकेत म्हटले होते, नवरा हा स्त्रीलंपट आणि दारुडा होता. त्यामुळे माझ्या वैवाहिक हक्कांवर गदा आली. न्यायमूर्तींनी या महिलेची याचिका फेटाळून लावली. महिलेने नवर्यावर जे आरोप केले त्यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही. बायकोच्या खोट्या आरोपांमुळे नवर्याची समाजात बदनामी झाली आणि ही क्रुरताच आहे.
एखाद्याच्या वर्तणुकीमुळे जर दुसर्या व्यक्तीवर मानसिक आघात होत असेल त्यामुळे त्या व्यक्तीसोबत राहणे अशक्य होत असेल तर अशी वर्तणुक कायद्यानुसार क्रुरता ठरते. या प्रकरणात याचिकाकर्त्या पत्नीने जे आरोप केलेत, ते बेछुट, तथ्यहिन आहेत. या आरोपांमुळे पतीची समाजात अप्रतिष्ठा झाली आहे. त्यामुळे पत्नीची वर्तणूक हिंदू विवाह कायदा कलम 13 (1) (ख-1) नुसार क्रुरता ठरते, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
COMMENTS