आशियाई कॉमनवेल्थ बीच हँडबॉल स्पर्धेसाठी मालदीवमध्ये भारताचे प्रतिनिधित्वइस्लामपूर / प्रतिनिधी : येथील जयंत हँडबॉल स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू पार

आशियाई कॉमनवेल्थ बीच हँडबॉल स्पर्धेसाठी मालदीवमध्ये भारताचे प्रतिनिधित्व
इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील जयंत हँडबॉल स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू पारस राजेंद्र कानडे याची मालदीवमध्ये सुरू असलेल्या आशियाई कॉमनवेल्थ बीच हँडबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत भारतासह मालदीव, बांगलादेश, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या देशांचे संघ सहभागी होत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या विरुध्द 2 विरुध्द 1 ने विजय मिळवण्यात पारसचा मोठा वाटा होता.
पारस हा कुशल खेळाडू असून जनता विद्यालयाच्या मैदानावर सराव करतो. त्याने यापूर्वी 12, 15 व 19 वर्षांखालील गटांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पारस हा जयंत अकॅडमीचा दुसरा आंतरराष्ट्रीय हँडबॉलपटू ठरला आहे. या यशामागे हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे सहसचिव व शिवछत्रपती पुरस्कार विजेते रुपेश मोरे यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले. त्यांनी गुणवंत खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत पारसला देशासाठी खेळण्याची संधी मिळवून दिली.

COMMENTS