Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाढे पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारात अनियमितता

परळी वैजनाथ प्रतिनिधी - तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारात अनियमितता दिसून आली असून ठरवून दिलेल्या टाईमटबल नुस

चार हजार विद्यार्थी शाळेत आलेच नाहीत
शहर काँग्रेसची सातपुतेंना साथ व कर्डिले-जगतापांवर टीकास्त्र
बस दरीत कोसळून तीन महिला भाविकांचा मृत्यू

परळी वैजनाथ प्रतिनिधी – तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारात अनियमितता दिसून आली असून ठरवून दिलेल्या टाईमटबल नुसार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याची मागणी उपसरपंच पांडुरंग गंगणे यांनी केली आहे.
गाढे पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत उपसरपंच पांडुरंग गंगणे यांनी शनिवारी (ता.05) अचानक शालेय पोषण आहार देण्याच्या वेळी शाळेस भेट दिली. यावेळी शालेय पोषण आहारात अनियमितता दिसून आली.शाळेच्या वतीने शासन नियमांप्रमाणे शालेय पोषण आहाराचे वेळापत्रक व आठवड्यात कोणत्या दिवशी काय देणार याची माहिती देणारा बोर्ड लावलेला आहे. मात्र वेळा पत्रकाप्रमाणे भेट दिलेल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिलेला नव्हता तसेच पोषण आहारात आठवड्यात एकदा फळे, सोयाबिस्कीट, दुध,चक्की, राजगिरा लाडू, शेंगदाणे, बेदाणे,चुरमुरे देणे आवश्यक आहे. शासनाने परिपत्रक काढलेले आहे. यासंदर्भात मुख्याध्यापकांना विचारले असता आम्ही वेळापत्रकाप्रमाणे पोषण आहार देतो पण आजच काही कारणामुळे बदल झाला आहे. वर्गात जावून  विद्यार्थ्यांना चौकशी केली असता विद्यार्थ्यांनी पोषण आहारात ज्याचा समावेश आहे ते कधीतरी मिळते, जास्त करुन खिचडीच देण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी उपसरपंच पांडुरंग गंगणे यांनी मुख्याध्यापकांना वेळापत्रकाप्रमाणे पोषण आहार देण्यात यावा. आम्ही अधूनमधून पाहणी करण्यास येणार आहोत. पुढच्या वेळी पोषण आहारात अनियमितता दिसून आल्यास गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे उपसरपंच पांडुरंग गंगणे यांनी सांगितले.

COMMENTS