Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार राजन साळवींची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी

मुंबई ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अलिबागमध्ये काल त्

अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाचे खासगीकरण थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन
मोतीबिंदू मुक्त राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील-मुख्यमंत्री फडणवीस
महाविकास आघाडीला भाजपचे प्रशासनातील दुवे शोधावे लागतील !

मुंबई ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अलिबागमध्ये काल त्यांची साडेचार तास चौकशी केली. यात एसीबीच्या अधिकार्‍यांनी साळवी, पत्नी, दोन्ही मुले, भाऊ आणि कुटुंबाच्या मालमत्तेची माहिती विचारण्यात आली. आमदार साळवी यांच्या चौकशीदरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


चौकशीनंतर आमदार साळवी म्हणाले, 20 जानेवारीपर्यंत आपण आपल्या संपूर्ण मालमत्तेची माहिती एसीबीला मागवलेल्या फॉरमॅटमध्ये देणार आहोत. माझ्या तपासात एसीबीला निराशा हाती येईल, कारण त्यांना माझ्याकडून काहीही बेकायदेशीर मिळणार नाही. राजन साळवी हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून कोकण, महाराष्ट्र, भारतातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान विधानसभेचे सदस्य आहेत. 2009, 2014 आणि 2019 मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर सलग तीन वेळा निवडून आले आहेत. राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राजन साळवी यांनी मंत्रीपदाच्या लाल दिव्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रेम आणि विश्‍वास हीच आपली खरी संपत्ती आहे, अशा शब्दां आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणार असल्याची भूमिका घेतली होती.

COMMENTS