Homeताज्या बातम्यादेश

लाल कांद्याच्या खरेदीसाठी हस्तक्षेप करा

केंद्र सरकारचे नाफेडला निर्देश

नवी दिल्ली : केंद्राने लाल कांद्याच्या किमती घसरल्याच्या अहवालाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील कन्झमशन केंद्रांकडे एकाच वेळी तो वितरण आणि विक्रीसाठ

ठाण्यात एका रात्रीत उपचारादरम्यान 17 रुग्णांच्या मृत्यू; अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत
न्यूझीलंडमध्ये ७ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
आष्टी-कडा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचे एकहाती वर्चस्व

नवी दिल्ली : केंद्राने लाल कांद्याच्या किमती घसरल्याच्या अहवालाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील कन्झमशन केंद्रांकडे एकाच वेळी तो वितरण आणि विक्रीसाठी पाठवण्याकरिता त्याच्या खरेदीसाठी बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे निर्देश नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात नाफेड आणि अर्थात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आणि नॅशनल कन्झ्युमर्स कोऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच एनसीसीएफ यासोबतच भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ यांना दिले आहेत.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, नाफेडने ताबडतोब कारवाई केली आणि 24 फेब्रुवारी 2023 रोजी खरेदी सुरू केली आणि गेल्या दहा दिवसात शेतकर्‍यांकडून 900 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त दराने सुमारे 4000 एमटी थेट खरेदी केल्याची नोंद आहे. नाफेडने 40 खरेदी केंद्रे उघडली असून तिथे शेतकरी त्यांचा साठा विकू शकतात आणि त्यांचे पैसे ऑनलाइन प्राप्त करू शकतात. नाफेडने खरेदी केंद्रांवरून दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्‍वर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोची येथे साठा नेण्याची व्यवस्था केली आहे. वर्ष 2022-23 मध्ये कांद्याचे अंदाजे उत्पादन 318 लाख मेट्रिक टन आहे, जे मागील वर्षीच्या 316.98 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त आहे. मागणी आणि पुरवठा तसेच निर्यात क्षमतेमुळे किमती स्थिर राहिल्या. तथापि, फेब्रुवारी महिन्यात लाल कांद्याच्या किमतीत घसरण झाली, विशेषत: महाराष्ट्र राज्यात जेथे आकार दर रु.500 -700/क्विटल पर्यंत घसरला. ही घसरण इतर राज्यांतील एकूणच वाढलेल्या उत्पादनामुळे तसेच देशातील प्रमुख उत्पादक जिल्ह्यांतील म्हणजेच नाशिकमधील पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

COMMENTS