Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हर्षवर्धन पाटील राष्ट्रीय सहकार साखर संघाचे नवे अध्यक्ष

राज्यसभा उमेदवारितून वगळल्यानंतर राजकीय पुनर्वसन

पुणे ः राज्यसभेचे प्रमुख दावेदार म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्याकडे बघितले जात होते. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारले होते. त्यामुळे हर्षवर्धन प

शिमलामध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकल्याची भीती
‘यादो की बारात’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्‍ध
’काश्मीर फाईल्स’ला परवानगी नको होती : शरद पवार

पुणे ः राज्यसभेचे प्रमुख दावेदार म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्याकडे बघितले जात होते. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारले होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. मात्र, आता राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर गुजरातचे केतनभाई पटेल यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय साखर संघावर पहिल्यांदाच भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राज्यसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा होती. त्यांना तिकिट देण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र, वेळेवर हर्षवर्धन पाटील यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे आता त्यांना मोठी जबाबदारी दिली जणार आहे. हर्षवर्धन पाटील हे सहकार क्षेत्रातील जाणकार आहे. तसेच साखर कारखान्याची धुरा देखील ते सांभाळतात ऊसाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचं मोठे योगदान झाल्याने त्यामुले महाराष्ट्राला राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली असून त्यावर हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध वर्णी लावण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात सहकार क्षेत्राचे मोठे जाळे पाहायला मिळते. यातच साखर कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सर्वदूर सहकार क्षेत्र पसरला आहे. अशा या सहकार्य क्षेत्राचे राष्ट्रीय अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांच्या निवडीमुळे हे पद महाराष्ट्राकडे आले आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत होईल असे मानले जाते. हर्षवर्धन पाटील हे सध्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देखील आहेत. त्याचप्रमाणे नीरा भीमा सहकारी साखर कारखाने देखील त्यांच्याकडे आहे.

COMMENTS