नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय योग दिवस हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बनला आहे आणि दरवर्षी आयुष मंत्रालय इतर केंद्रीय मंत्रालये आणि योग संबंधित संस्था
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय योग दिवस हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बनला आहे आणि दरवर्षी आयुष मंत्रालय इतर केंद्रीय मंत्रालये आणि योग संबंधित संस्थांच्या सहकार्याने जास्तीत जास्त संख्येने लोकांचे सहकार्य आणि सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करत असल्याचे आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी बोलताना सांगितले. विविध मंत्रालये आणि हितसंबंधी संघटनांच्या सक्रिय पाठिंब्याने आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 भारताच्या प्रत्येक कानाकोपर्यात आणि जगातील सर्व राष्ट्रांपर्यंत पोहोचण्याची खात्री आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 साजरा करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी नवी दिल्ली येथे आंतर-मंत्रालयीन बैठक झाली. अनेक केंद्रीय मंत्र्यांनी बैठकीला हजेरी लावली आणि या उपक्रमात लोकसहभाग वाढवणे, संपूर्ण सरकारी दृष्टिकोन प्रतिबिंबित होईल अशी संसाधने एकत्र करणे आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस-2023 अधिक सफल बनवण्यासाठी मिशन मोडमध्ये एकत्रित प्रयत्न करणे यासंबंधी सूचना दिल्या. आयुष विभाग सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि आयुष विभाग विशेष सहसचिव कविता गर्ग यांनी आजवर मंत्र्यांनी केलेल्या तयारीचे कौतुक केले आणि आंतरराष्ट्रीय योग दिवसाची उद्दिष्टे, विविध उपक्रम आणि विविध आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कामगिरीची रूपरेषा सांगितली. आयुष मंत्रालयाच्या सादरीकरणात आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 साठी सुचविलेल्या उपक्रमांचा देखील समावेश करण्यात आला होता. आयुष मंत्रालयाने 2015 पासून अनेक आंतरराष्ट्रीय योग दिवसांचे यशस्वी आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश भारताचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग करणे तसेच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती इत्यादींबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे हाच आहे. डिसेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला हा उपक्रम सर्वानुमते मंजूर होणे हा एक विक्रम होता. 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरातील लोकांच्या आरोग्यासाठीच्या मोठ्या चळवळीच्या रुपात विकसित झाला आहे.
COMMENTS