Homeताज्या बातम्याविदेश

युक्रेनच्या गृहमंत्र्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह 16 जणांचा मृत्यू

युक्रेन प्रतिनिधी- युक्रेन ची राजधानी कीवमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात युक्रेनच्या मंत्र्यासह 16 जणांचा मृत्यू झाल्य

कर्जत तालुक्यातील 40 बचत गटांना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप  
प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करताना एकाचा पाय घसरून मृत्यू
जोड कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा; विशेष बैठक लावून कालव्यांच्या भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लावा : पालकमंत्री

युक्रेन प्रतिनिधी- युक्रेन ची राजधानी कीवमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात युक्रेनच्या मंत्र्यासह 16 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. हेलिकॉप्टर कीवच्या बाहेरील लहान मुलांच्या शाळेत कोसळले. ही घटना कीवच्या ईशान्येकडील ब्रोव्हरी शहरात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित लोक घटनास्थळी पोहोचले. आतापर्यंत अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. युक्रेनचे राष्ट्रीय पोलिस प्रमुख इगोर क्लिमेंको यांनी सांगितले की, आतापर्यंत 16 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. मृतांमध्ये युक्रेनच्या गृहमंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि गृहमंत्री डेनिस मोनास्ट्रिस्की आणि त्यांचे डेप्युटी येवगेनी येसेनिन यांचा समावेश आहे. मोनास्ट्रिस्की 2021 मध्येच युक्रेनचे गृहमंत्री बनले होते. या अपघातात दोन मुलांसह 22 जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी प्ले स्कूलमध्ये मुले आणि शाळेचे कर्मचारी उपस्थित होते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

COMMENTS