Homeताज्या बातम्यादेश

आपचे सत्येंद्र जैन यांना अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली ः  आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने

केळी उत्पादक शेतकऱ्यांना भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा : कृषीमंत्री दादाजी भुसे
बिबट्या प्रकरणात मच्छिंद्र मंडलिक यांची निर्दोष मुक्तता
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसीआधारकार्ड बॅक खात्याशी संलग्न करण्याचे आवाहन

नवी दिल्ली ः  आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीचे कारण देत जैन यांना अंतरिम जामीन मंजूर केला. या प्रकरणातील शेवटची सुनावणी 10 जुलै रोजी झाली होती, ज्यामध्ये न्यायालयाने त्यांच्या जामीनाला 24 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती.
जैन यांचे वकील एएम सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितले होते की, जैन यांना तीन रुग्णालयांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा. दरम्यान, 21 जुलै रोजी जैन यांच्यावर दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. जैन यांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. यापूर्वी 26 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने जैन यांना वैद्यकीय स्थितीच्या आधारे सहा आठवड्यांचा जामीन मंजूर केला होता. 11 जुलै हा त्यांच्या जामिनाचा शेवटचा दिवस होता. जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले होते, जैन खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतात, परंतु कोणत्याही साक्षीदारावर प्रभाव टाकणार नाहीत. तसेच ते दिल्लीबाहेर जाणार नाहीत. विशेष म्हणजे, जैन 31 मे 2022 पासून कोठडीत होते. 6 एप्रिल 2023 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळल्यानंतर, त्याने मे 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील केले, तेथून 360 दिवसांनंतर 42 दिवसांसाठी जामीन मिळाला.

COMMENTS