Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 गोयकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस इंटरक्टिव पॅनल भेट

कर्जत/ प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील गोयकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस विधान परिषद सदस्य प्रा.राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून इंटरक्ट

…तर, पुण्यातील दुर्घटना घडली नसती ः सोनाली तनपुरे
राहुरी-ताहराबाद रस्त्याचे काम अखेर सुरू
रंग लावण्यासाठी महिलेची छेड, दोनजणांविरुद्ध गुन्हा

कर्जत/ प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील गोयकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस विधान परिषद सदस्य प्रा.राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून इंटरक्टिव पॅनल भेट देण्यात आले.
गोयकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात शाळेला इंटरक्टिव पॅनल भेट देण्यात आले.यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, चिंचोली काळदातचे माजी सरपंच परशुराम व्हरकटे, खंडाळा- गोयकरवाडीचे सरपंच किसनाबाई बनाजी खंडेकर, धुळाजी खंडेकर, रामहरी महारनवर, गुणाजी गोयकर, अच्युतराव पारखे, हनुमंत पारखे, अशोक दिंडे, नाथा गोयकर, आजिनाथ माने, कोमल वाघमोडे, शाळेचे मुख्याध्यापक अशोक खराडे,सहशिक्षिका जयश्री पोतदार आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अशोक दिंडे, प्रकाश पारखे यांनी मनोगते व्यक्त केली. सुनील यादव यांनी आपल्या मनोगतात शाळेतील मुलांची भाषणे, मानवी बाराखडीच्या आधारे मुलांनी ओळखलेली नावे, शाळेत बनवलेले कागदी टोप -फुले तसेच शालेय परिसर व स्वच्छता याबद्दल मुलांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. मुख्याध्यापक अशोक खराडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS