Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावरकरांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान ः मुख्यमंत्री शिंदे

राज्यात भाजप-शिवसेनेने काढली सावरकर गौरव यात्रा

मुंबई/प्रतिनिधी ः  सावरकरांच्या सन्मानार्थ भाजपा व शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केल

अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ भरपाई द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौर्‍यावर
कोकणात मंत्रिमंडळ बैठकीची आवश्यकता

मुंबई/प्रतिनिधी ः  सावरकरांच्या सन्मानार्थ भाजपा व शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. या गौरव यात्रेला संबोधित करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सावरकरांचा अपमान सहन करणार नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.वीर सावरकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती, प्रखर हिंदुत्ववाद प्रत्येक देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु सातत्याने त्यांचा अपमान केला जात आहे. जाणून बुजून त्यांच्याविरोधात बोलले जात आहे. या लोकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी ही यात्रा काढली असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच सावरकरांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपा आणि शिवसेनेने काढली आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांचे अनुकरण करणार्‍यांचे मी या यात्रेत स्वागत करतो.
दरम्यान, दादरमधील भाजप व शिवसेनेच्या या यात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले आहेत. विद्यार्थिनीही पारंपारिक वेशभूषेत या यात्रेत सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीची आज वज्रमुठ सभा होत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे शहरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. स्वातंत्रवीर सावरकर चौक समर्थनगर येथुन या यात्रेला सुरुवात होऊन, निराला बाजार मार्गे महात्मा फुले चौक, औरंगपुरा गुलमंडी मार्गे, उत्तम मिठाई भंडार भाटी बजार, पांदरीबा, अप्पाहलवाई मिठाई संस्थान गणपती मंदिर समारोप होईल. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात 30 मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी तसेच राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.

राहुल गांधींनी माफी मागावी ः आशिष शेलार – दादरमध्येही शिवसेना व भाजपकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. भाजप नेते आशिष शेलार या यात्रेत सहभागी झाली आहे. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, राहुल गांधींनी सावरकरांविरोधात जे वक्तव्य केले आहे, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना माफी मागायला लावावी. तसेच, मविआच्या छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेवरही आशिष शेलार यांनी टीका केली. वज्रमुठ ही एकीची असते. मात्र, 10 ते 15 जण जेव्हा हात हातात घेऊन चालतात तेव्हा त्याला चाचपडणे म्हणतात.

COMMENTS