माजलगाव प्रतिनिधी- शहरातील जिजामाता नगर येथील एका व्यक्तिला शाहु नगर भागातील एकाने अज्ञात कारणाने शिविगाळ केली म्हणुन त्या व्यक्तिच्या पुतण्याने

माजलगाव प्रतिनिधी- शहरातील जिजामाता नगर येथील एका व्यक्तिला शाहु नगर भागातील एकाने अज्ञात कारणाने शिविगाळ केली म्हणुन त्या व्यक्तिच्या पुतण्याने त्याच्या चुलत्याला का शिविगाळ केली असा जाब विचारणार्या वर शिविगाळ करण्यार्याने धारदार लोखंडी बतई ने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या हल्ला प्रकरणी फिर्यादी श्रीनाथ नवनाथ शिंदे, रा.जिजामाता नगर,माजलगाव यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार त्यांच्या चुलत्याला प्रकरणातील आरोपी विशाल ज्ञानेश्वर माने याने शिविगाळ केली होती. याचा जाब विचारण्या साठी श्रीनाथ 15 आक्टोंबर रोजी च्या दुपारी 4वा.च्या सुमास विशाल माने कडे बाजार रोड शाहुनगर येथे गेले असता विशाल माने याने मारहाण करून धारदार लोखंडी बतईने श्रीनाथ च्या बोटावर मारुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादी नुसार नमुद नामे आरोपी विरोधात भादंवि. कलम 323,324,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS