शेवगाव : पृथ्वीसिंह काकडे यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याचा सल्ला देत, कोणत्याही संकटाच्या वेळी संस्था त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला. ते चापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप व सदिच्छा कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास अंजली चिंतामण, अनिल मगर, अशोक आघवणे, संजय मरकड, संजय दुधाडे, वत्सला जाधव, दादासाहेब ज्योतीक, शितल गोरे, जालिंदर मारेकर आणि हरीष केदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.आपल्या भाषणात पृथ्वीसिंह काकडे यांनी विद्यार्थ्यांना मित्र विचारपूर्वक निवडण्याचा सल्ला देत, भविष्यात त्यांनी सी.ए., डॉक्टर, इंजिनिअर यांसारख्या क्षेत्रांत प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपमुख्याध्यापिका अंजली चिंतामण यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून पुढे जाण्याचे आवाहन करत, परीक्षेला कॉपीमुक्त, तणावरहित आणि निर्भयपणे सामोरे जाण्याचा सल्ला दिला. “ही परीक्षा आयुष्याची शेवटची परीक्षा नाही, त्यामुळे निराश होऊ नका,” असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक सुरेश भापकर आणि भारत म्हस्के यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सृष्टी जाधव, समृद्धी काळे, आरती काळे, प्रथमेश तानवडे, पुष्कर वावरे, साई गोर्डे, ज्ञानेश्वरी पातकळ आणि गायत्री पातकळ यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय दुधाडे यांनी केले, अनुमोदन संजय मरकड यांनी केले, तर आभार सुदर्शन गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

शेवगाव : पृथ्वीसिंह काकडे यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याचा सल्ला देत, कोणत्याही संकटाच्या वेळी संस्था त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला. ते चापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप व सदिच्छा कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमास अंजली चिंतामण, अनिल मगर, अशोक आघवणे, संजय मरकड, संजय दुधाडे, वत्सला जाधव, दादासाहेब ज्योतीक, शितल गोरे, जालिंदर मारेकर आणि हरीष केदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.आपल्या भाषणात पृथ्वीसिंह काकडे यांनी विद्यार्थ्यांना मित्र विचारपूर्वक निवडण्याचा सल्ला देत, भविष्यात त्यांनी सी.ए., डॉक्टर, इंजिनिअर यांसारख्या क्षेत्रांत प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
उपमुख्याध्यापिका अंजली चिंतामण यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून पुढे जाण्याचे आवाहन करत, परीक्षेला कॉपीमुक्त, तणावरहित आणि निर्भयपणे सामोरे जाण्याचा सल्ला दिला. “ही परीक्षा आयुष्याची शेवटची परीक्षा नाही, त्यामुळे निराश होऊ नका,” असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक सुरेश भापकर आणि भारत म्हस्के यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सृष्टी जाधव, समृद्धी काळे, आरती काळे, प्रथमेश तानवडे, पुष्कर वावरे, साई गोर्डे, ज्ञानेश्वरी पातकळ आणि गायत्री पातकळ यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय दुधाडे यांनी केले, अनुमोदन संजय मरकड यांनी केले, तर आभार सुदर्शन गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

COMMENTS