निवळी वृक्षलागवड प्रकरणी चौकशी समिती : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवळी वृक्षलागवड प्रकरणी चौकशी समिती : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई दि. 28 : निवळी वृक्षलागवड प्रकरणी विभागीय वन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आल्याचे वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज व

शेती करु द्या! नाहीतर चोरी करण्याची परवानगी द्या! आदिवासी संघटनेची मागणी! | LokNews24
गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी द्या
देवळाली प्रवरा नगर परिषदेचे वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला

मुंबई दि. 28 : निवळी वृक्षलागवड प्रकरणी विभागीय वन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आल्याचे वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत सांगितले. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील निवळी येथे वृक्ष लागवड माहिमेत गैरव्यवहार झाल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य मेघना साकोरे- बोर्डीकर, धर्मराव बाबा अत्राम, प्रकाश आबिटकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
भरणे म्हणाले की, सन 2019 मध्ये पावसाळ्यात निवळी येथे वनीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी एकूण 45 हेक्टर क्षेत्रावर रोपे लागवड करण्यात आली होती, त्यापैकी 20 हेक्टर क्षेत्रावर 16 हजार ट्रेंचेस खोदण्यात येवून तेथे 32 हजार रोपांची लागवड करण्यात आली. तसेच 25 हेक्टर क्षेत्रावर 20 हजार ट्रेंचेस खोदून तेथे 40 हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. मात्र यामध्ये रकमेचा अपहार झाला नाही. महाफॉरेस्टच्या पोर्टलवर मे 2020 मध्ये 20 हेक्टर आणि 25 हेक्टर क्षेत्रांवर रोपाची टक्केवारी अनुक्रमे 79% आणि 82 % दाखविण्यात आली आहे तर ऑक्टोबर 2020 मध्ये रोपांची टक्केवारी अनुक्रमे 81 % आणि 87% दाखविण्यात आली. मे 2021 मध्ये अनुक्रमे 75% आणि 76 % दर्शविण्यात आली आहे. तर एप्रिल 2021 मध्ये रोपवन जळाल्याने महाफॉरेस्ट पोर्टलवर ऑक्टोबर 2021 मध्ये रोपांची टक्केवारी अनुक्रमे 22 % आणि 21 % दाखविण्यात आली आहे. टक्केवारी घसरण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीबाबत विभागीय वन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.

COMMENTS