Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपर्डीतील शेतकऱ्यांवर चुकीच्या पंचनाम्यामुळे अन्याय; नागरिकांचा आरोप ; तहसीलदारांकडे न्यायाची मागणी

कर्जत : तालुक्यातील कोपर्डी येथे मागासवर्गीय भूमिहीन शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या शासकीय जमिनीबाबत महसूल अधिकाऱ्यांनी चुकीचे पंचनामे व चुकीचा स्थळ पाहणी अहवाल तयार करून अन्याय केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत संबंधित ठिकाणी तहसीलदारांनी स्वतः पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी लेखी अर्जाद्वारे केली आहे. या संदर्भात शेतकरी सचिन दिलीप चव्हाण, शंभूराव शिंदे, अतुल मनोहर चव्हाण, अमोल मनोहर चव्हाण आणि श्याम दिलीप चव्हाण यांनी तहसीलदार कर्जत यांच्याकडे लेखी अर्ज दिलेला आहे. यामध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, कोपर्डी येथील हे सर्व शेतकरी भूमिहीन असून शासनाने सन 1971 मध्ये त्यांना वर्ग दोनच्या शासकीय जमिनी वाटप केल्या आहेत. या जमिनींचे गट क्रमांक 211 व 212 असून अद्याप अधिकृत मोजणी व हद्द कायम करण्यात आलेली नाही. यासाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्जही केला आहे. दरम्यान परिसरातील गट क्रमांक 209, 210, 214, 215 व 216 मधील काही व्यक्तींनी महसूल प्रशासनाकडे तक्रार करून शेतकऱ्यांनी रस्त्यात अडथळे निर्माण केल्याचा आरोप केला. या तक्रारीवरून महसूल विभागाचे अधिकारी 21 ऑगस्ट 2025 रोजी घटनास्थळी आले. मात्र यावेळी तलाठी उपस्थित नसताना कोतवाल व काही नागरिकांच्या उपस्थितीत स्थळ पाहणी करून पंचनामा तयार करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या मते पंचनाम्यात अनेक ठिकाणी चुकीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात गट क्रमांक 211 व 212 च्या बांधावरून जाणारा रस्ता गट क्रमांक 214 मध्ये जात असताना तो चुकीने गट क्रमांक 209 मध्ये दाखविण्यात आला आहे. तसेच गट क्रमांक 213 मधून ट्रॅक्टर व वाहनांसाठी रस्ता असल्याची नोंदही चुकीची करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गट नंबर 211 व 212 मधून 30 फुटापेक्षा जास्त मोठे रस्ते तयार करून अतिक्रमण करण्यात आले आहे. या सर्व चुकीच्या नोंदींमुळे मागासवर्गीय शेतकऱ्यांवर अन्याय होत असून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचेही शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

कोपरगावमध्ये 48 घरकुलांना मंजुरी : नगराध्यक्ष संधान
धरणात बुडून युवकाचा मृत्यू
शिवी दिल्यास ५०० रुपयांचा दंड; कोळगावात महिला ग्रामसभेचा निर्णय

कर्जत : तालुक्यातील कोपर्डी येथे मागासवर्गीय भूमिहीन शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या शासकीय जमिनीबाबत महसूल अधिकाऱ्यांनी चुकीचे पंचनामे व चुकीचा स्थळ पाहणी अहवाल तयार करून अन्याय केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत संबंधित ठिकाणी तहसीलदारांनी स्वतः पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी लेखी अर्जाद्वारे केली आहे.

या संदर्भात शेतकरी सचिन दिलीप चव्हाण, शंभूराव शिंदे, अतुल मनोहर चव्हाण, अमोल मनोहर चव्हाण आणि श्याम दिलीप चव्हाण यांनी तहसीलदार कर्जत यांच्याकडे लेखी अर्ज दिलेला आहे.

यामध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, कोपर्डी येथील हे सर्व शेतकरी भूमिहीन असून शासनाने सन 1971 मध्ये त्यांना वर्ग दोनच्या शासकीय जमिनी वाटप केल्या आहेत. या जमिनींचे गट क्रमांक 211 व 212 असून अद्याप अधिकृत मोजणी व हद्द कायम करण्यात आलेली नाही. यासाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्जही केला आहे.

दरम्यान परिसरातील गट क्रमांक 209, 210, 214, 215 व 216 मधील काही व्यक्तींनी महसूल प्रशासनाकडे तक्रार करून शेतकऱ्यांनी रस्त्यात अडथळे निर्माण केल्याचा आरोप केला. या तक्रारीवरून महसूल विभागाचे अधिकारी 21 ऑगस्ट 2025 रोजी घटनास्थळी आले. मात्र यावेळी तलाठी उपस्थित नसताना कोतवाल व काही नागरिकांच्या उपस्थितीत स्थळ पाहणी करून पंचनामा तयार करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या मते पंचनाम्यात अनेक ठिकाणी चुकीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात गट क्रमांक 211 व 212 च्या बांधावरून जाणारा रस्ता गट क्रमांक 214 मध्ये जात असताना तो चुकीने गट क्रमांक 209 मध्ये दाखविण्यात आला आहे. तसेच गट क्रमांक 213 मधून ट्रॅक्टर व वाहनांसाठी रस्ता असल्याची नोंदही चुकीची करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गट नंबर 211 व 212 मधून 30 फुटापेक्षा जास्त मोठे रस्ते तयार करून अतिक्रमण करण्यात आले आहे.

या सर्व चुकीच्या नोंदींमुळे मागासवर्गीय शेतकऱ्यांवर अन्याय होत असून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचेही शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS