Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नथुराम गोडसेसोबत अन्यायच झाला

गुणरत्न सदावर्तेचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

मुंबई/प्रतिनिधी ः आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत राहणारे गुणरत्न सदावर्ते यांनी सोमवारी पुन्हा एकदा महात्मा गांधी यांचा मारेकरी असलेल्या

देह व्यापारातील महिलांनी केला वाईन विक्रीला विरोध | DAINIK LOKMNTHAN
क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा फुले यांना भारतरत्न द्या : माधवराव तिटमे
दोन दिवसांपासून पुणतांबामार्गे बस वाहतूक बंद

मुंबई/प्रतिनिधी ः आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत राहणारे गुणरत्न सदावर्ते यांनी सोमवारी पुन्हा एकदा महात्मा गांधी यांचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेबद्दल आदारार्थी उल्लेख करून सदावर्ते यांनी त्यांच्यासोबत न्याय झाला नसल्याचे वक्तव्य केले आहे. त्याशिवाय, राज्यातून शरद पवार यांच्या विचारांचा व्हायरस निर्जंतुकीकरण करणार असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यातील एसटी कर्मचार्‍यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते यांच्या संघटनेचे पॅनल उतरले आहे. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सदावर्ते यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. पत्रकार परिषद ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सोबतच नथुराम गोडसे यांचा फोटो देखील लावण्यात आला होता, हे विशेष.  सदावर्ते यांनी म्हटले की, मी गांधींच्या मतांशी सहमत नाही. मी नथुराम गोडसे यांचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवरायांसोबत लावला आहे. मी संविधानाचा अभ्यासक आहे. नथुराम गोडसे यांचा जो खटला चालला. त्यामध्ये नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता. मी संविधानामध्ये झहऊ केली आहे. मी अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की गोडसे यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आहे. नथुराम गोडसे यांच्यावरील खटला हा मानवाधिकाराविरोधातील असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. नथुराम गोडसे इथून पुढे माझ्या चळवळीत असतील असेही त्यांनी म्हटले.  पत्रकार परिषदेत बोलताना, गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टीका केली. शरद पवार यांची लायकी आता सगळ्यांना कळली असल्याचे त्यांनी म्हटले. शरद पवारांचा वैचारिक व्हायरस असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.  
सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन चैत्यभूमी पासून शरद पवार व्हायरसचे निर्जंतुकीकरण रॅलीला सुरुवात करणार असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटिव्ह बँक शरद पवारांची आर्थिक नाडी आहे. पवारांमुळे एकदाही या कष्टकर्‍यांना अध्यक्ष पद मिळालं नाही. या निवडणुकीत आमचं पॅनल लढणार असून त्यात विजयी होईल, असेही त्यांनी म्हटले.  

COMMENTS