बदलापूर प्रतिनिधी - रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे नऊ महिन्याच्या चिमुरडीला भयानक त्रास सहन करावा लागला आहे. लसीकरणानंतर इंजेक्शनची सुई तब्बल

बदलापूर प्रतिनिधी – रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे नऊ महिन्याच्या चिमुरडीला भयानक त्रास सहन करावा लागला आहे. लसीकरणानंतर इंजेक्शनची सुई तब्बल पाच महिने चिमुकलीच्या मांडीतच होती. बदलापूर मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शस्त्रक्रिया करुन या मुलीच्या मांडीत असलेली सुई काढण्यात आली. या प्रकारानंतर मुलीच्या पालकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लसीकरण केल्यानंतर इंजेक्शनची सुई चिमुकलीच्या मांडीतच राहिली होती. नवव्या महिन्यात लसीकरण केल्यानंतर तब्बल पाच महिने इंजेक्शनची सुई चिमुकलीच्या मांडीतच अडकून होती. या प्रकरणी इंजेक्शन देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी चिमुकलीच्या आई-वडिलांनी केली आहे.
COMMENTS