Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दर्जेदार शिक्षणासाठी पायाभूत सुविधा महत्त्वाच्या : आ.काळे

डाऊच बु. येथे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीच्या खोलीचे भूमिपूजन  कोपरगाव : शिक्षणाचा पाया मजबूत असेल तरच भविष्यात सक्षम, सुसंस्कृत आणि आत्मविश्वासू

जनहिताला पहिल्याच दिवशी काळे गटाकडून मिठाचा खडा :  सोनवणे
एसएसजीएम महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात  
शिवरायांचा कारभार हा लोककल्याणकारी होता : माजी आ. काळे

डाऊच बु. येथे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीच्या खोलीचे भूमिपूजन 

कोपरगाव : शिक्षणाचा पाया मजबूत असेल तरच भविष्यात सक्षम, सुसंस्कृत आणि आत्मविश्वासू पिढी घडू शकणार आहे. लहान वयातच योग्य वातावरण, सुरक्षित इमारत आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास मुलांच्या शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा मिळते. त्यामुळे दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास करणे ही काळाची गरज असून दर्जदार शिक्षणासाठी पायाभूत सुविधा अत्यंत महत्वाच्या असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

 कोपरगाव मतदारसंघातील डाऊच बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोलीच्या कामाचे भूमिपूजन तसेच अंगणवाडी शाळेच्या खोलीचे लोकार्पण आ. काळे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२३) पार पडले या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. अंगणवाडीच्या नवनिर्मित खोलीमुळे माता-पालकांचीही चिंता कमी होणार असून लहानग्यांना सुरक्षित,स्वच्छ आणि पोषक वातावरणात शिक्षण व संस्कार मिळणार आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या नव्या खोलीमुळे विद्यार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.

 याप्रसंगी ह.भ.प. मनसुख दहे, काळे कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, धर्मा दहे, भिवराव दहे, बाजीराव होन, सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंच संजय ढमाले, सरपंच संजय गुरसळ, शिवाजी दहे, जयवंत दहे, सुनिल बढे, गोरख दहे, रामनाथ जाधव, बापू दहे, अक्षय दहे, योगेश दहे, बाबासाहेब होन, संजय गायकवाड, तुळशीराम दहे, भाऊसाहेब दहे, देवेंद्र दहे, दगु गायकवाड, केशव बढे, मच्छिंद्र ढमाले, कांतीलाल दहे, पन्नालाल दहे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS