अमित शाह यांच्याच काळात महाराष्ट्रात २५ वर्ष जुन्या शिवसेना-भाजपा युतीचा तुकडा पडला…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमित शाह यांच्याच काळात महाराष्ट्रात २५ वर्ष जुन्या शिवसेना-भाजपा युतीचा तुकडा पडला…

प्रतिनिधी : मुंबईगुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना बदलून मंत्रिमंडळ विस्तार करताना त्यांच्याजागी नियुक्त केलेल्या भूपेंद्र पटेल यांनी रुपाणी मंत

महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर रिक्षा
नक्षल्यांना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन… मुख्यमंत्र्यांनी मागितला १२०० कोटींचा निधी
मंत्री चंद्रकांत पाटलांवर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज

प्रतिनिधी : मुंबई
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना बदलून मंत्रिमंडळ विस्तार करताना त्यांच्याजागी नियुक्त केलेल्या भूपेंद्र पटेल यांनी रुपाणी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

मला कुणीही हटवू शकत नाही’, असं म्हणणाऱ्या नितीन पटेल यांना देखील यांना देखील नारळ देण्यात आले . यामुळे भाजपच्या मनात नेमकं काय सुरु आहे ? यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात भाष्य केले.

तसेच शिवसेनेकडून मोदींच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करतानाच राज्यातील भाजपा नेत्यांवर निशाणा साधण्यात आला .

अग्रलेखात म्हटले की , रुपाणी यांच्यामागे अमित शहांचे पाठबळ होते. पण रुपाणी आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाला घरचा रस्ता दाखवून मोदी-नड्डा जोडीने एक जोरकस संदेश स्वपक्षास दिला आहे.

नितीन पटेल स्वत:ला हेवीवेट समजत होते. पण नेतृत्वाची घडीच पूर्णपणे बदलून टाकताना पाटीदार समाजाचे नेते नितीन पटेल यांनाही मोडून काढले. हे धाडसाचे काम असले, तरी स्वपक्षात अशी धाडसी पावले मोदीच टाकू शकतात.शिवसेनेने अग्रलेखात मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे .

मोदी हाच भाजपाचा खरा चेहरा आहे. बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. मोदींचा चेहरा नसेल, तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील.

२०२४च्या तयारीसाठी त्यांनी साहसी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. तीन राज्यांचे मुख्यमंत्री बदलले. गुजरातमध्ये तर सगळी जमीन उकरून किडकी झाडं मुळापासून उपटून टाकली. हाच प्रयोग त्यांची सरकारं नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो. मोदी है तो मुमकीन है म्हणायचं ते इथे असे शिवसेनेने म्हटले आहे .

शिवसेनकडून गृहमंत्री अमित शाह यांना धारेवर धरण्यात आले . मागील काही महिन्यांच्या राजकीय घडामोडी पाहत एक आसाम सोडले, तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालात तर अमित शाह यांनी स्वतःला झोकून दिले .

केरळात ई-श्रीधरनसारखा मोहरा कामी लावला होता. पण अमित शाह यांच्याच काळात महाराष्ट्रात २५ वर्ष जुन्या शिवसेना-भाजपा युतीचा तुकडा पडला आणि भाजपाला विरोधात बसावे लागले.

पश्चिम बंगालातही कपाळमोक्ष झाला. जे. पी. नड्डांच्या माध्यमातून मोदींनी दुरुस्तीचे काम हाती घेतले असावे ते यामुळेच, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे .

COMMENTS