इम्फाळ : गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असून, हा हिंसाचार रोखण्यात अपयश असतांना पुन्हा एकदा म्यानमधील तब्बल 900 दहशत
इम्फाळ : गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असून, हा हिंसाचार रोखण्यात अपयश असतांना पुन्हा एकदा म्यानमधील तब्बल 900 दहशतवाद्यांनी मणिपूरमध्ये घुसखोरी केल्याचा दावा गुप्तचर विभागाने आपल्या अहवालात केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये या दहशतवाद्यांकडून आणखी कोणती घातपात घडवण्याची योजना तर आखण्यात येत नाही ना? यासंदर्भात तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याच्या वृत्ताला मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनीही याला दुजोरा दिला आहे.
ते म्हणाले की, कुकी दहशतवाद्यांचा धोका लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. म्यानमारला लागून असलेल्या डोंगराळ भागात विशेष सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. या भागात कुकीचे समाजाचे वर्चस्व आहे. म्यानमारमधून घुसखोरी केलेले हे दहशतवादी ड्रोन चालवण्यातही माहीर आहेत. कुलदीप सिंह था म्हणाले की, गुप्तचर विभागाच्या या अहवालामुळे सुरक्षा दलाची चिंता वाढली आहे. हा अहवाल सर्व जिल्ह्यांच्या एसपी आणि इतर पोलिस अधिकार्यांना पाठवण्यात आला आहे. म्यानमारमधून मणिपूरमध्ये येणारे दहशतवादी ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र डागण्यात सक्षम आहेत. तसेच जंगलात लढण्यात देखील सक्षम असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालात पुढे म्हटले आहे की, हे दहशतवादी 30-30 च्या गटात राज्यभरात घुसण्याच्या तयारीत आहेत. यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एकत्रितपणे मेईतेई गावांना लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार आहे. याबाबत कुलदीप सिंह म्हणाले की, हे 100 टक्के बरोबर आहे. इंटेलिजन्स इनपुटवर विश्वास ठेवून आम्ही योग्य ती तयारी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्यानमारमधील सशस्त्र गट जुताईच्या विरोधात लढत आहे आणि त्यांनी त्याचा मोठा भाग ताब्यात घेतला आहे. चिन प्रांतात जुटा आणि वांशिक गटांमध्ये भीषण संघर्ष होत आहे. भारताच्या सीमेला लागून असलेल्या भागातील सैनिक पळून जाऊन भारतात येण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. त्यांचा पाठलाग करताना बिनी प्रांतातील बंडखोरही भारतात घुसण्याच्या प्रयत्न करतात. वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या हिंसाचारात विदेशी शक्तींचाही हात असल्याचे मणिपूर सरकारने अनेकदा सांगितले आहे. म्यानमारमधून होणारी घुसखोरीही हिंसाचाराला कारणीभूत आहे. 1 सप्टेंबरपासून वाढलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत कुलदीप सिंह म्हणाले की, 18 सप्टेंबर रोजी स्ट्रॅटेजिक ऑपरेशन ग्रुपची बैठक झाली आहे. यामध्ये सुरक्षा यंत्रणांना एकत्रितपणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याशिवाय गुप्तचर अहवालांवरही चर्चा करण्यात आली आहे. गुप्तचर अहवालाबाबत एजन्सीच्या उच्च अधिकार्यांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय चुराचंदपूर, फेरजौल, टेंगनोपाल, कमजोंग आणि उखरुल जिल्ह्यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
COMMENTS