Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकारणातील अपरिहार्यता

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारण ज्या गोष्टीभोवती फिरतांना दिसून येत आहे, त्यातून राजकारणाची अपरिहार्यता दिसून येत आहे. तकलादू राजक

धर्म व राजकारणाची सरमिसळ
दिव्यांगांना पाठबळ
ग्रामपंचायत निवडणुकीचे कल

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारण ज्या गोष्टीभोवती फिरतांना दिसून येत आहे, त्यातून राजकारणाची अपरिहार्यता दिसून येत आहे. तकलादू राजकारण, आणि तपास यंत्रणांच्या इशार्‍यावर होणारे पक्षांतर दिसून येत आहे. खरंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून केंद्रातील सत्ताधार्‍यांचा तीळपापड झाला होता. त्यानंतर प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमधील नेत्यांना रडारवर घेत त्यांच्यामागे तपासयंत्रणांचा ससेमिरा सुरू झाला. या ससेमिर्‍यातून सुटका करून घेण्यासाठी अनेक आमदार आपल्या पक्षनेतृत्वाला गळ घालत होते की, चला ना भाजपसोबत. त्यांचा हेतू होता, हा तपासयंत्रणांच्या ससेमिर्‍यापासून सुटका व्हावी. शिवाय असे बंड करावे, असा हेतू तेव्हाच्या शिंदे गटाच्या मनातही नव्हता. तसे जर असते, तर या गटाने महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्ष सत्ताच उपभोगली नसती. त्यांनी तेव्हाच बंड केले असते. अडीच वर्षांनंतर ते बंड करत होते, याचाच अर्थ त्यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव होता. तोच प्रकार अजित पवार गटाचा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वी अजित पवार भाजपसोबत गेले होते, तेव्हा त्यांनी शपथही घेतली होती. असे असतांना, त्यांनी माघार का घ्यावी, आणि साडेतीन वर्षांनंतर पुन्हा भाजपसोबत का जावे, यामागचे मुख्य कारण म्हणजे तुरुंगात जाण्याची भीती आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून होणारा दबाव. काँगे्रसचा एक महत्वाचा चेहरा असलेले बाबा सिद्दीकी देखील काँगे्रसला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात जातांना दिसून येत आहे. मुंबईमध्ये काँगे्रसला गळती लागण्याचे प्रमुख कारण काय आहे. तर मुंबई महापालिका यामागचे प्रमुख कारण आहे. बरं तब्बल 48 वर्ष ज्यांची संपूर्ण ह्यात काँगे्रसमध्ये गेली, ते बाबा सिद्दीकी अजित पवार गटामध्ये जाण्याचे कारण काय, तर तेच. तपास यंत्रणांचा दबाव. कारण 48 वर्षांमध्ये काँगे्रसने सिद्दीकी यांना अनेक पदे दिली, मंत्रीपदे दिली. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्‍चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खाती देखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. .2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती. शिवाय अनेक वर्ष काँगे्रस सत्तेत नसतांना देखील त्यांनी विरोधी आमदार राहून काम केले, तरी त्यांना कधी सत्ताधारी पक्षात जावेसे वाटले नाही, मात्र 48 वर्षानंतर त्यांना दुसर्‍या गटात जाण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे तपासयंत्रणा होय. बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईतील निवासस्थानावर तसेच अनेक कार्यालयांमध्ये ईडीने 2017 मध्ये छापे मारले आहेत. मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. वांद्रे येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये बनावट कंपनी बनवून 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बाबा सिद्दीकी आणि त्यांचा सहकारी बांधकाम व्यावसायिक रफीक मकबूल कुरेशी यांच्यावर करण्यात आला. ईडीने 2018 मध्ये बाबा सिद्दीकी यांची 462 कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यानंतर ईडीची पुन्हा एकदा वक्रदृष्टी पडली असल्याचे संकेत त्यांना मिळाल्यानंतरच त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजकारणातील अपरिहार्यता पुन्हा एकदा नजरेसमोर येतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता राजकारणातील 90 नेत्यांचे, लोकप्रतिनिधींचे हात दगडाखाली अडकलेले आहेत, त्याचा फायदा सत्तेतील पक्षाकडून वारंवार घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकतर आम्हाला सहकार्य करा, त्यासाठी आमच्या पक्षात या, आम्हाला ताकद द्या, किंवा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा असाच संदेश यातूनन दिसून येत आहे. आणि याच कारणामुळे ज्यांचे हात दगडाखाली आहेत, असे नेते पक्षांतर करतांना दिसून येत आहे. 

COMMENTS