बीड प्रतिनिधी - प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.या व्हिडीओ मध्ये महाराज कॅमेऱ्यामनवरच संतापल्याचे दिसून आले.चालू कि
बीड प्रतिनिधी – प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.या व्हिडीओ मध्ये महाराज कॅमेऱ्यामनवरच संतापल्याचे दिसून आले.चालू किर्तनादरम्यान, इंदुरीकर महाराज प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांवर कमालीचे संपातले होते. त्यांनी किर्तनात अभंग सादर करताना कॅमेऱ्यामनला खाली उतरण्याचा इशारा केला.कॅमेरे बंद व्हावेत, म्हणून त्यांनी थेट कॅमेरा ऑपरेट करणाऱ्याला दमही दिला.अखेर इंदुरीकर महाराजांना शांत करण्यासाठी आणि कॅमेरे सुरु राहावेत,यासाठी धनंजय मुंडे यांना मध्ये पडावं लागलं. त्यानंतर अखेर हा वाद मिटला. बीडमध्ये एका किर्तन कार्यक्रमादरम्यान हा प्रसंग घडला. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
COMMENTS