Homeताज्या बातम्यादेश

धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये अंदाधुंद गोळीबार

झारखंड प्रतिनिधी - धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. झारखंडहून दिल्लीला जाणाऱ्या सियालदह राजधानी एक्स्प्रेसम

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोपपत्र दाखल
20 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार | DAINIK LOKMNTHAN
लॉकडाऊनची शक्यता कमी ; मात्र निर्बंधात वाढ

झारखंड प्रतिनिधी – धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. झारखंडहून दिल्लीला जाणाऱ्या सियालदह राजधानी एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने अचानक गोळीबार सुरू केला. आरोपीचा कोच अटेंडंटसोबत काही मुद्द्यावरून वाद झाला, त्यानंतर त्याने रागाच्या भरात आपले पिस्तूल काढून ट्रेनमध्ये गोळीबार केल्याचे म्हटलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणालाही दुखापत झालेली नाही. गोळीबारानंतर आरोपीला ट्रेनमधून उतरवून अटक करण्यात आली आहे.गुरुवारी 12 ऑक्टोबर रोजी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराच्या शीख रेजिमेंटच्या एका मद्यधुंद निवृत्त सैनिकाने गुरुवारी रात्री सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये गोळीबार केला. आरोपी हरपिंदर सिंग धनबादहून रेल्वेच्या बी-8 बोगीत चढला होता. गाडी मातारी स्थानकावरून जात असतानाच हरपिंदर सिंगने त्याच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. त्यामुळे बोगीत गोंधळ निर्माण झाला.

हरपिंदर सिंग धनबाद येथील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच ट्रेनमधील सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं आणि नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर राजधानी एक्सप्रेस कोडरमा स्थानकावर थांबवण्यात आली आणि आरोपीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी बी-8 बोगीच्या टॉयलेटमधून एक काडतुस जप्त केले आहे. आपल्याकडून चुकून गोळी सुटल्याचे हरपिंदर सिंगचे म्हणणे आहे. पोलिसांनी हरपिंदर सिंगला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे.या सगळ्या प्रकारानंतर गुरुवारी रात्री हरपिंदरला रात्री उशिरा वैद्यकीय उपचारासाठी कोडरमा रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर त्याला ट्रेनने धनबादला आणले जाईल. त्याच्यावर धनबादच्या रेल्वे स्थानकात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी हरपिंदरकडून रिव्हॉल्व्हरशिवाय त्याचे नवी दिल्लीचे आरक्षण तिकीट जप्त केले आहे. त्याचे आरक्षण हावडा राजधानीत होते पण तो मद्यधुंद अवस्थेत सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये चढला. सीट नसल्याने तो बी-8 बोगीच्या टॉयलेटशेजारी उभा होता.मद्यपान केल्यामुळे त्याला नीट उभं राहता येत नव्हत असं म्हटलं जात आहे. त्यामुळे गोळी सुटली असावी असा अंदाज लावला जात आहे.

COMMENTS