Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेत इंदिरा गांधी यांची जयंती साजरी 

कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

नाशिक : देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय ए

‘अशिक्षित’ म्हणत काजोलने उडवली राजकीय नेत्यांची खिल्ली
सरकारला निर्णयाचे स्वातंत्र्य असावेच!
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला स्थगिती

नाशिक : देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. सर्वप्रथम इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली यावेळी विस्तार अधिकारी शिक्षण धनंजय कोळी, निलेश पाटोळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे, वरिष्ठ सहायक राहुल देवरे, विश्वजित पाटील, कनिष्ठ सहायक सुनील सोनवणे, अरुण भदाणे, संजय बाविस्कर, सलीम पटेल प्रवीण ठाकरे, बाळासाहेब निरगुडे, किशोर वारे, हिम्मतराव चौधरी, शिवाजी खैरे, सुनीता गांगुर्डे, रचना जाधव, प्राजक्ता खरोटे आदी कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS