Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंडिगोने उन्हाळ्यासाठी पुणे-बँकाक सेवा बंद

पुणे : खासगी विमान कंपनी ‘इंडिगो’ने आगामी उन्हाळी हंगामात पुणे-बँकॉक या आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 29 मार्

राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता
डोंगर उतारावर राहणार्‍यांना सतर्कतेचा इशारा
मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाहीत | LOK News 24

पुणे : खासगी विमान कंपनी ‘इंडिगो’ने आगामी उन्हाळी हंगामात पुणे-बँकॉक या आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 29 मार्चपासून पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम सुरू होत असून, या कालावधीत पुणे-बँकॉक तसेच बँकॉक-पुणे या दोन्ही दिशांतील तिकिटांची नोंदणी बंद करण्यात आली आहे.
या निर्णयामागील ठोस कारण कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. कामकाजातील बदल आणि मार्गांचे पुनरावलोकन सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधीही हिवाळी हंगामात विविध कारणांमुळे काही आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सेवा स्थगित करण्यात आल्या होत्या. पुणे-बँकॉक मार्ग हा प्रवाशांमध्ये लोकप्रिय मानला जात होता. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आणि प्रवाशांची संख्या सातत्याने कमी राहिल्याने ही सेवा आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच कंपनीने हा मार्ग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या सेवेच्या रद्दबातलमुळे पुण्यातील प्रवाशांसाठी आता बँकॉकला जाण्यासाठी पर्याय मर्यादित झाले आहेत. सध्या या मार्गावर ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ची सेवा उपलब्ध असून, त्यावरच प्रवाशांना अवलंबून राहावे लागणार आहे. विमानवाहतूक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, मागणी आणि खर्च यांचा समतोल साधण्यासाठी कंपन्या मार्गांचे पुनर्मूल्यांकन करत असतात. त्याचाच भाग म्हणून काही मार्ग तात्पुरते किंवा कायमस्वरूपी बंद केले जातात.

COMMENTS